शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

वाडीत बसपाने रोखली भाजपची गाडी

By admin | Updated: April 24, 2015 02:12 IST

पूर्ण शक्ती पणाला लावूनही नागपूरच्या सीमेवर असलेल्या वाडी नगर परिषदेत भाजपची गाडी बहुमतापर्यंत जाता जाता मध्येच बसपाने अडवली.

नागपूर : पूर्ण शक्ती पणाला लावूनही नागपूरच्या सीमेवर असलेल्या वाडी नगर परिषदेत भाजपची गाडी बहुमतापर्यंत जाता जाता मध्येच बसपाने अडवली. मात्र निवडणुकीनंतर शिवसेनेशी युती करून अपक्षाच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याचा दावा भाजपने केला असला तरी संख्याबळाचा विचार करता अपक्षांच्या हातीच सत्तेची चाबी राहणार आहे तर दुसरीकडे आजवर राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या मोवाड नगर परिषदेत बहुमत मिळविण्यात भाजपला यश आले असले तरी अध्यक्षपद मात्र ईश्वरचिठ्ठीने राष्ट्रवादीच्या झोळीत आले. कामठी येथील पोटनिवडणुकीत बहुजन रिपब्लिकन एकता मंचने भाजपच्या मदतीने काँग्रेसकडून जागा हिसकावली. या निवडणुकीमुळे जिल्ह्यात भाजपची लाट अद्याप ओसरली नसल्याचे तर काँग्रेसची हवा पूर्णपणे गोल झाल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्कावाडी ग्रामपंचायत यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती. नगर परिषद स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत २५ जागांपैकी केवळ चार जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या तर काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. ७ जागांवर बसपाने मुसंडी मारली. तेथील वॉर्ड क्र. १२ आणि २० ते २५ या सात जागांवर दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला बसपाने विजयी मतांजवळ फिरकूसुद्धा दिले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह दिग्गजांनी प्रचारसभा घेतल्या. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही कार्यकर्त्यांना ‘ऊर्जा’ दिली. मात्र, त्यानंतर भाजपला २५ पैकी फक्त १० जागा जिंकता आल्या. विशेष म्हणजे बसपाने तब्बल ७ जागा जिंकत भाजपचा विजयरथ अडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. शिवसेनेला दोन जागा राष्ट्रवादीला ४ जागा जिंकण्यात यश आले. अपक्षाने एक जागा जिंकली. आता भाजप सेना एकत्र आले तरी १२ जागा होतात व राष्ट्रवादी-बसपा- काँग्रेस एकत्र आले तरी १२ जागाच होतात. त्यामुळे येथे अपक्ष उमेदवारावर सर्वकाही अवलंबून आहे. वाडीत शिवसेना व अपक्षाच्या मदतीने भाजपचाच झेंडा फडकेल, असा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी केला आहे. मोवाडमध्ये राष्ट्रवादीला अपयश आले. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसची गेल्या १० वर्षांपासून सत्ता होती. मात्र या निवडणुकीत भाजप-सेना युतीने बाजी मारली. १७ सदस्यांच्या या नगरपरिषदेत भाजपला ९ तर शिवसेनेला २ जागा मिळाल्या. राष्ट्रवादीला ५ तर काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. येथील अध्यक्षपद अनुसूचित जाती महिला संवर्गासाठी राखीव होते. या जागेसाठी वॉर्ड क्र. १६ मध्ये राष्ट्रवादीच्या रंजना सोळंके व शिवसेनेच्या मंगला गजबे यांच्यात लढत झाली. दोन्ही उमेदवारांना १४७ एवढी सारखी मते मिळाली. त्यामुळे ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. ईश्वरचिठ्ठीत राष्ट्रवादीच्या रंजना सोळंके यांचा विजय झाला. त्यामुळे भाजप-सेना युतीला बहुमत मिळूनही अध्यक्षपद मात्र राष्ट्रवादी भूषविणार आहे. कामठी नगर परिषदेच्या रिक्त जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे संजय खोब्रागडे यांनी १६८९ मते घेतली. त्यांनी काँग्रेसचे प्रशांत मानवटकर (१३०८) यांचा पराभव केला. (प्रतिनिधी)