शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

भाजपची सेनेला तर काँग्रेसची बसपाला ना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2016 02:56 IST

महापालिका झोन सभापतिपदासाठी आठ झोनमध्ये प्रत्येकी एकच अर्ज दाखल करण्यात आल्यामुळे संबंधित आठ झोनमध्ये निवडणूक बिनविरोध झाली आहे.

आठ झोन सभापती बिनविरोध : आशीनगर, नेहरूनगरमध्ये निवडणूकनागपूर : महापालिका झोन सभापतिपदासाठी आठ झोनमध्ये प्रत्येकी एकच अर्ज दाखल करण्यात आल्यामुळे संबंधित आठ झोनमध्ये निवडणूक बिनविरोध झाली आहे. भाजप - सेना व काँग्रेस- बसपात ताळमेळ न झाल्याने आशीनगर व नेहरूनगर झोनमध्ये आज, शनिवारी निवडणूक होईल. पुढील वर्षी महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीची समीकरणे आखत भाजपने आपले झोन सभापती निश्चित केले आहेत. दोन झोनमध्ये काँग्रेस व भाजपला एकमेकांची साथ देत भाजपला मात देण्याची संधी होती. मात्र, सध्यातरी दोघांनीही ही संधी गमावल्याचे चित्र आहे. लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज या भाजपचे अधिक संख्याबळ असलेल्या झोनमध्ये भाजप उमेदवाराविरुद्ध एकानेही अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे लक्ष्मीनगरात नीलिमा बावणे, धरमपेठमध्ये वर्षा ठाकरे, हनुमाननगरमध्ये स्वाती आखतकर, धंतोलीत सुमित्रा जाधव, गांधीबागमध्ये विद्या कन्हेरे, सतरंजीपुरा येथे प्रवीण भिसीकर, लकडगंजमध्ये कांता रारोकर बिनविरोध निवडून आल्या. मंगळवारी झोनमध्ये कॉंग्रेसचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे येथे काँग्रेसचे अरुण डवरे यांच्याविरोधात भाजपने अर्ज दाखल केला नाही. येथे काँग्रेसकडून डॉ. चोपडा यांनी स्वत:साठी फिल्डिंग लावली होती. लोकमंचनेही वेगळी चूल मांडण्याचा विचार केला होता. मात्र, शेवटी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी सर्वांना विश्वासात घेऊन डवरे यांची उमेदवारी दाखल केली. (प्रतिनिधी)आशीनगरमध्ये सांगोळे- जैस्वाल लढत आशीनगर झोनमध्ये सभापतिपदासाठी शिवसेनेचे बंडू तळवेकर उत्सुक होते. मात्र, भाजपने सेनेला मदत नाकारली. येथे भाजपने अपक्ष नगरसेविका सविता सांगोळे यांना पुढे केले. या झोनमध्ये बसपाने काँग्रेसला मदत मागितली होती. त्या बदल्यात हनुमाननगर झोनमध्ये काँग्रेसला मदत करण्याची बसपाची तयारी होती. मात्र, ऐनवेळी समीकरण बिघडले. स्थानिक राजकारणामुळे काँग्रेसने आशीनगरमध्ये बसपाला मदत नाकारली. शेवटी बसपाने येथे हर्षला जैस्वाल यांना रिंगणात उतरविले. या झोनमध्ये कॉंग्रेसचे दोन नगरसेवक असून या दोन मतांवर विजयाचे गणित अवलंबून आहे.नेहरूनगरध्ये ईश्वरचिठ्ठी ?नेहरूनगर झोनमध्ये कॉंग्रेसच्या मालू वनवे व भाजपप्रणित नागपूर विकास आघाडीचे हरीश डिकोंडवार यांच्यात लढत होईल. येथे भाजप आघाडीचे सहा, काँग्रेसचे पाच व राष्ट्रवादीचे एक सदस्य आहेत. शिवसेनेचे दोन सदस्य आहेत. येथे शिवसेनेच्या सदस्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली तर ईश्वर चिठ्ठी काढण्याची वेळ येऊ शकते. किशोर गजभियेंचा अर्ज विलंबामुळे नाकारला ४हनुमाननगरमध्ये काँग्रेसचे ६, राष्ट्रवादीचे एक, भाजपचे ७ नगरसेवक आहेत. बसपाच्या सत्यभामा लोखंडे व बसपातून निलंबित करण्यात आलेले किशोर गजभिये हे दोन नगरसेवक आहेत. येथे काँग्रेस, राष्ट्रवादी व गजभिये यांनी एकत्र येत भाजपला मात देण्याची रणनीती आखली होती. मात्र, गजभिये वेळेत अर्ज भरू न शकल्याने भाजपच्या स्वाती आखतकर यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. काँग्रेसकडून गुड्डू तिवारी इच्छुक होते. पण संख्याबळ कमी होते. किशोर गजभिये यांनी काँग्रेसला साथ देण्याची तयारी दर्शविली मात्र स्वत:ला सभापती करा, अशी अट घातली. काँग्रेसच्या गोटात बरेच विचारमंथन झाले. दुपारी १.३० पर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. अखेरच्या क्षणी दुपारी १. २५ वाजता गजभिये यांच्या अर्जावर वासुदेवराव ढोके व सुजाता कोंबाडे या काँग्रेस नगरसेवकांनी सूचक व अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली. शेवटचे दोन मिनिट बाकी असताना गजभिये धावत अर्ज भरण्यासाठी महापालिका सचिव हरीश दुबे यांच्या कक्षात गेले. गेले. तेव्हा दुबे त्यांना दारावरच भेटले. गजभिये यांनी दुबे यांना थांबविले व अर्ज स्वीकारण्याची विनंती केली. आपल्या घडीत अजून दीड मिनिट बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. यावर दुबे यांनी प्रशासनाच्या घडयाळानुसार वेळ संपल्याचे सांगत अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे गजभिये यांची उमेदवारी हुकली. आपल्याला दिलेल्या पाठिंब्यासाठी गजभिये यांनी काँग्रेस नेत्यांचे आभार मानले.