शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मनपा निवडणुकीसाठी भाजपचा ‘महासंपर्क’

By admin | Updated: June 24, 2015 02:57 IST

केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असताना नागपूर महापालिकेत मात्र असलेली सत्ता हातून जाऊ नये,

दीडपट जागांचे टार्गेट : कार्यकर्त्यांवर वॉचनागपूर : केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असताना नागपूर महापालिकेत मात्र असलेली सत्ता हातून जाऊ नये, यावर भाजप नेत्यांनी गंभीरपणे विचार करण्यास सुरुवात केली आहे. हेवीवेट केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्री असलेल्या शहरातील महापालिकेत भाजप हरली तर मोठी नामुष्की ओढवेल, याची धास्ती भाजपने घेतली आहे. त्यामुळेच महापालिका निवडणूक दीड वर्षांवर असली तरी महाजनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून प्रत्यक्ष मतदार भेटीची रंगीत तालीम कार्यकर्त्यांकडून करवून घेतली जाणार आहे.भाजपचा पसारा नागपूर शहरात निश्चितच वाढला आहे. शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे यांच्या नेतृत्वाखाली सहा लाखांवर सदस्य नोंदणी करण्यात आली आहे. येत्या काळात १०० सदस्यांची नोंदणी करणाऱ्यांना क्रियाशील सदस्य बनविले जाणार आहे. मध्यंतरी मोबाईल व इंटरनेटवर नोंदणी करून सदस्य करण्याची मोहीम राबविण्यात आली. मात्र, या सदस्यांपर्यंत भाजपच्या कार्यकर्त्याने प्रत्यक्ष पोहचावे, यासाठी महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी नव्याने सदस्य झालेल्यांच्या प्रभाग व वॉर्डनिहाय याद्या तयार करण्यात आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी भाजपच्या शहर कार्यकारिणीची बैठक झाली. तीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. कृष्णा खोपडे यांच्याकडेच शहर अध्यक्षपदाची धुरा कायम ठेवण्याची घोषणा केली. ही घोषणा करतानाच त्यांनी महापालिकेत सध्यापेक्षा दीडपट जागा जिंकण्याचे टार्गेट कार्यकर्त्यांना दिले. विशेष म्हणजे केंद्रीय परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनीही कार्यकर्त्यांना नेत्यांच्या मागे हार घालत मिरवण्यापेक्षा वॉर्डात जाऊन जनतेची कामे करण्याचा सल्ला दिला. या दोन्ही नेत्यांनी केलेले आवाहन व दिलेला सल्ला यावरून महापालिकेची निवडणूक भाजपने आतापासून गांभीर्याने घेतल्याचे स्पष्ट होते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काही अपक्ष नगरसेवकांनी भाजपला भक्कमपणे मदत केली. तर दुसऱ्या पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांनीही जोर लावला. अशात या दोन्ही बाजू सांभाळत स्थानिक भाजप कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी भाजपची तारेवरची कसरत होणार आहे. मात्र, भाजप कार्यकर्त्याचे नाव वॉर्डातील नागरिकांकडून समोर आले तर त्याचा प्रथम विचार केला जाईल, असे नेत्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळेच महाजनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून इच्छुक कार्यकर्ते वॉर्डात आपापल्या अस्तित्वाची चाचपणी करणार आहेत. (प्रतिनिधी)