शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील काटोल व रामटेकमध्ये भाजपच लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 10:46 IST

नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि रामटेक मतदार संघात भाजपच लढेल असे सांगत भाजपचे प्रदेश महामंत्री आ. अतुल भातखळकर यांनी मंगळवारी या दोन्ही मतदार संघातील नेत्यांना आश्वस्त केले.

ठळक मुद्देकोअर कमिटीत झाले मंथनजिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती आटोपल्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजप-सेना युतीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि रामटेक मतदार संघात भाजपच लढेल. २०१४ मध्ये या दोन्ही जागा भाजपने जिंकल्या होत्या. जिंकलेल्या जागा सेनेला सोडण्याचा प्रश्नच नाही, असे सांगत भाजपचे प्रदेश महामंत्री आ. अतुल भातखळकर यांनी मंगळवारी या दोन्ही मतदार संघातील नेत्यांना आश्वस्त केले.नागपूर जिल्ह्यातील (ग्रामीण) सहाही मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती भातखळकर यांनी मंगळवारी रविभवन येथे घेतल्या. मुलाखतीनंतर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. तीत जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, जिल्ह्यातील चारही महामंत्री, आमदार आणि महिला पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत काटोल, रामटेक आणि सावनेर मतदार संघाबाबत पक्षाची काय भूमिका आहे, जागावाटप कसे होईल, असा सवाल काही पदाधिकाऱ्यांनी भातखळकर यांना विचारला असता २०१४ मध्ये भाजपचे उमेदवार जिथे विजयी झाले, त्या जागा भाजपच लढेल. यासोबतच जिथे शिवसेनेचे उमेदवार जिंकले असेल त्या जागा शिवसेना लढेल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे काटोल, रामटेकवर सेनेचा दावा असला तरी या दोन्ही जागा भाजपच लढणार असल्याचे संकेत भातखळकर यांच्याकडून मिळाल्याने येथील इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.दरम्यान, भातखळकर यांनी दुपारी जिल्ह्यातील सहाही मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. काटोल मतदार संघातून विधानसभा प्रमुख चरणसिंग ठाकूर, माजी पंचायत समिती सभापती संदीप सरोदे, माजी जिल्हा परिषद सभापती उकेश चव्हाण, पक्षात नव्यानेच दाखल झालेले प्रवीण लोहे, श्यामराव बारई, मनोज कोरडे, दिलीप ठाकरे, अ‍ॅड. दीपक केणे यांनी मुलाखती दिल्या.जिल्ह्यात भाजपमध्ये दावेदारांची सर्वाधिक संख्या सावनेर मतदार संघात आहे. येथे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांच्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश मानकर, सोनबा मुसळे, अ‍ॅड. प्रकाश टेकाडे, जिल्हा महामंत्री संजय टेकाडे, दिलीप जाधव, रामराव मोवाडे, किशोर मुसळे, अशोक तांदुळकर, राजेश जीवतोडे, अशोक धोटे आदींनी मुलाखती दिल्या.उमरेड मतदार संघात आमदार सुधीर पारवे, डॉ. शिरीष मेश्राम, प्रतिभा मांडवकर, अरविंद गजभिये, आनंद खडसे मुलाखतीला हजर होते. रामटेक मतदार संघातून आ. डी. मल्लिकार्जुन रेड्डी, अविनाश खळतकर, कमलाकर मेंघरे, योगेश वाडीभस्मे, संजय मुलमुले, राजेश ठाकरे, विजय हटवार, रामभाऊ दिवटे यांनी मुलाखती दिल्या.काटोल, रामटेक, उमरेड आणि सावनेर मतदार संघात इच्छुकांची संख्या मोठी असली तरी, कामठी आणि हिंगणा मतदार संघातील मुलाखतीदरम्यान तसे घडले नाही. कामठीत भाजपकडून विद्यमान आमदार ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि हिंगण्यात आ. समीर मेघे प्रबळ दावेदार आहेत.

कळमेश्वर, काटोल लक्ष्य२०१४ च्या निवडणुकीत काटोल मतदार संघ भाजपने राष्ट्रवादीकडून हिसकावला. येथे आशिष देशमुख यांनी राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांचा पराभव केला. आमदारकीची टर्म पूर्ण होण्यापूर्वीच आशिष देशमुख यांनी भाजपला रामराम करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या जागेवर सेनेने प्रबळ दावा ठोकला आहे. असे असले तरी युतीत ही जागा भाजपाच्या वाट्याला येणार असल्याचे संकेत भातखळकर यांनी कोअर कमिटीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे काटोलची जागा जिंकण्यासाठी या बैठकीत अ‍ॅक्शन प्लान निश्चित करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. जिल्ह्यात सावनेरची एकमेव जागा काँग्रेसकडे आहे. २०१४ मध्ये येथे ऐनवेळी भाजपचे सोनबा मुसळे यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणामुळे रद्द झाला होता. त्यामुळे सेना येथे दुसऱ्या क्रमांकावर राहिली. त्यामुळे सावनेरबाबतचा निर्णय दोन्ही पक्षाचे नेते घेतील, अशी माहिती आहे. मात्र सावनेरमध्ये पक्ष कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे या बैठकीत निश्चित झाल्याचे कळते.

हौसे-गवसेही मुलाखतीलाजिल्ह्यातील सहाही मतदार संघातील निवडक इच्छुकांना पक्षाकडून मुलाखतीला बोलावण्यात आले होते. जिल्हाध्यक्षांनी प्रदेश भाजपकडून आलेल्या यादीनुसार संबंधित उमेदवारांना मुलाखतीला निमंत्रितही केले होते. मात्र वृत्तपत्रातील बातम्यांचा आधार घेत पक्षातील हौसे-गवसे उमेदवारही मुलाखतीला हजर झाले. त्यामुळे रविभवन येथे नियोजित वेळापत्रकानुसार मुलाखतीला विलंब झाला. मुलाखतीच्या स्थळी निमंत्रित उमेदवारापेक्षा नवे चेहरे दिसून आल्याने काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. भातखळकर यांनी या नवख्या दावेदारांनाही मुलाखतीसाठी संधी दिली.

टॅग्स :Electionनिवडणूक