शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
2
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
3
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
4
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
5
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
6
राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
7
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
9
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
10
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
11
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
12
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
13
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
14
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
15
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!
16
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडला, दिग्दर्शक प्रियदर्शन यांची आली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचे नाव बदलून 'शहीद हिंदू घाटी पर्यटन स्थळ' करा, उच्च न्यायालयात याचिका
18
भाच्याच्या प्रेमासाठी पतीची हत्या करुन शेजाऱ्यांना पाठवलं जेलमध्ये, सत्य समजताच हादरले पोलीस
19
3 दिवसांत सर केली हिमालयाची 5 शिखरे, CISFच्या महिला अधिकाऱ्याची ऐतिहासिक कमगिरी
20
जम्मू-काश्मीरमधील सुरनकोट मंदिरावरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात; SIA कडून मोठा खुलासा

भाजपचे टार्गेट पूर्ण, आता संपर्क अभियान !

By admin | Updated: April 23, 2015 02:35 IST

भाजपने देशभरात १० कोटी सदस्य नोंदणीचे लक्ष्य निश्चित केले होते. महाराष्ट्राने आपल्या वाट्याचे एक कोटी सदस्य करून टार्गेट पूर्ण केले आहे.

नागपूर : भाजपने देशभरात १० कोटी सदस्य नोंदणीचे लक्ष्य निश्चित केले होते. महाराष्ट्राने आपल्या वाट्याचे एक कोटी सदस्य करून टार्गेट पूर्ण केले आहे. आता १ मे पासून पक्षातर्फे ‘संपर्क अभियान’ राबविण्यात येणार असून या अंतर्गत आॅनलाईन नोंदणीत सदस्य झालेल्यांशी प्रत्यक्ष संपर्क केला जाईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दानवे यांनी मंगळवारी नागपुरात येत सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून संपर्क अभियानाचा शुभारंभ केला जाईल. पक्षाचे एक लाख सक्रिय सदस्य झाले आहेत. या सदस्यांना आॅगस्ट ते आॅक्टोबर या तीन महिन्यात प्रशिक्षण दिले जाईल. ४ ते ६ मे दरम्यान कोल्हापूर येथे पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आहे. ५ रोजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उद्घाटन करतील तर ६ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी समारोप करतील. या बैठकीत प्रदेशची नवी कार्यकारिणी जाहीर होईल, असेही त्यांनी सांगितले. महामंडळ व विविध कमिट्यांवरील नियुक्त्यांबाबत नुकतीच भाजप- सेनेची बैठक झाली. तीत ७०-३० चे प्रमाण ठरले. नगर पालिकेच्या निवडणुका संपताच ३० एप्रिल पूर्वी यावर निर्णय घेतला जाईल. दानवे यांनी यापूर्वीच्या नागपूर भेटीत दुसऱ्या पक्षातील ५ आमदार व २१ माजी आमदार संपर्कात असल्याचे सूतोवाच केले होते याची पत्रकारांनी आठवण करून दिली असता फक्त एक आठवडा वाट पहा, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. नवी मुंबई व औरंगाबाद या दोन्ही महापालिकांच्या निवडणुकीत भाजप-सेना युतीचा विजय होईल. औरंगाबादमध्ये एमआयएमचा प्रभाव फक्त ८ ते १० वॉर्डांपुरता मर्यादित आहे. तसाही एमआयएमने भाजपला नुकसान होत नाही, असेही ते म्हणाले. या वेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)