शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपती शासन; भाजपा म्हणते कायदेशीर पाऊल, अन्य पक्षांत नाराजीचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 11:36 IST

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. या निर्णयाचे भारतीय जनता पक्षातील पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे. तर दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र विरोध व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देनिर्णयावर उमटताहेत दुहेरी प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील सत्तास्थापनेच्या पेचात अडकलेल्या राजकीय परिस्थितीनंतर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. या निर्णयाचे भारतीय जनता पक्षातील पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे. तर दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र विरोध व्यक्त केला आहे. हे घटनाबाह्य पाऊल, असल्याचे मत या मंडळींनी व्यक्त केले आहे.

सर्व पर्याय संपल्यावरच निर्णय : व्यासप्रदेश भाजपाचे प्रवक्ते आमदार गिरीश व्यास म्हणाले, राज्यपालांनी हा निर्णय कायद्याच्या चौकटीत राहूनच घेतलेला आहे. त्यांनी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला, त्यानंतर शिवसेनेला आणि शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे समर्थनपत्र न घेताच शिवसेना राज्यापालांना भेटली होती. सर्व पर्याय संपल्यावरच राज्यपालांनी हा निर्णय घेतला आहे.

हे तर सर्वाेच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन : राऊतप्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. नितीन राऊत म्हणाले, राष्ट्रपती शासन लागू करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच्या निर्णयांमध्ये काही मार्गदर्शक तत्त्वे स्पष्ट केली आहेत. महाराष्ट्रत राष्ट्रपती राजवट लागू करताना या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाले आहे. राज्यात चुकीच्या पद्धतीने राष्ट्रपती शासन लागू करून लोकशाही आणि राज्यघटनेच्या मर्यादा ओलांडण्याचे काम भाजपा नेतृत्वातील केंद्र सरकारने केले आहे. राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत राज्यपालांनी प्रयत्न करायला हवे होते. परंतु राज्यपालांनीही भाजपाच्या मनासारखे काम काम केले.

दुर्देवी निर्णय : जयस्वालशिवसेनेला समर्थन देणारे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांनीही या निर्णयाबद्दल खेद व्यक्त केला. ते म्हणाले, हा दुर्दैवी निर्णय आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी सर्व पर्यायाचा विचार करायला हवा होता.

असंवैधानिक व अलोकतांत्रिकराष्ट्रपती राजवट ही राज्याच्या प्रगतीसाठी व लोकशाहीसाठी मारक असून ही केंद्रातील भाजपचीच खेळी आहे. या राष्ट्रपती राजवटीमध्ये घोडेबाजारांना ऊत येऊन कर्नाटक, गोवा व मणिपूर प्रमाणेच भाजप इतर पक्षातील आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करेल. परंतु, हा त्यांचा प्रयत्न सगळे आमदार हाणून पडतील व राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचे सरकार बनेल. आपण या असंवैधानिक व अलोकतांत्रिक राष्ट्रपती राजवटीचा निषेध करतो.

- डॉ. आशिष देशमुख, माजी आमदार, काँग्रेस

विकासात मागे जाण्याचा धोकाराष्ट्रपती राजवट ही कुठल्याही राज्याच्या हिताची नाही. जेथेही असे झाले तो प्रदेश विकासात मागे गेला आहे. व्यापार, उद्योगावर परिणाम होते. यातून बाहेर निघायला वेळ लागतो. राज्यपाल खूप अनुभवी आहेत. त्यांनी थोडी सामंजस्याची भूमिका घेतली असती तर राज्यातील जनतेला राष्ट्रपती राजवट पाहण्याची वेळ आली नसती.- दुनेश्वर पेठे, गटनेते, राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :President Ruleराष्ट्रपती राजवट