शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजप आमदाराकडून शिवसेना सदस्यांच्या कामाला कात्री

By admin | Updated: September 10, 2015 03:44 IST

भाजप-सेनेचे वरवर छान दिसत असले तरी, एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी ते कधीही सोडत नाही.

प्रस्तावच केले नामंजूर : राजकीय आकसाचा फटकानागपूर : भाजप-सेनेचे वरवर छान दिसत असले तरी, एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी ते कधीही सोडत नाही. नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदार संघात भाजपाच्या आमदाराने शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांवर कुरघोडी करीत त्यांच्या कामाचे प्रस्तावच नामंजूर केले. बुधवारी झालेल्या जि.प.च्या स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनेच्या सदस्यांनी आमदारावरील राग व्यक्त करीत, आमदार राजकीय आकसापोटी आदिवासी क्षेत्रावर अन्याय करीत असल्याचा आरोप केला. नागपूर जिल्हा परिषदेंतर्गत ९.२० कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे (डीपीसी) पाठविण्यात आला होता. प्रत्येक सर्कलनुसार सदस्यांनी बांधकामाचे प्रस्ताव समितीला दिले होते. मात्र डीपीसीने प्रस्ताव मंजूर करताना जि.प.ला विचारात घेतले नाही. रामटेक तालुक्यातील तीन शिवसेनेच्या सदस्यांचा व काटोल तालुक्यातील माजी उपाध्यक्षांच्या सर्कलच्या बांधकामाचा प्रस्ताव डीपीसीने नामंजूर केला. हे चार प्रस्ताव नामंजूर करून उर्वरित सर्व सदस्यांच्या प्रस्तावाला सरसकट मंजुरी दिली. प्रस्ताव नामंजूर केलेल्या सदस्यांमध्ये शिवसेनेच्या नगरधन सर्कलच्या सदस्य वर्षा धोपटे, मनसर सर्कलच्या आशा गायकवाड व उमरी सर्कलच्या शोभा झाडे यांचा समावेश आहे. हे तीनही सर्कल रामटेक विधानसभा क्षेत्रात येतात. डीपीसीने प्रस्ताव नामंजूर करण्यामागचे कुठलेही कारण दिलेले नाही. जिल्हा नियोजन समितीत आमदार सदस्य असल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणून राजकीय आकसापोटी आपल्याच मतदार संघातील विकास कामांना खीळ घातली. यासंदर्भात शिवसेनेच्या तीनही सदस्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित करून आमदारांप्रति आपला राग व्यक्त केला. हे तीनही सर्कल आदिवासी भागात येत असल्याने, आमदाराने विकास कामांचा प्रस्ताव नामंजूर करून आदिवासी भागावर अन्याय केल्याचा आरोप त्यांनी केला. (प्रतिनिधी)