शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

भाजपाने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला; गजानन किर्तीकर यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 16:39 IST

विधानसभा निवडणुकीत भाजपाने युती मोडून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप शिवसेनेचे पूर्व विदर्भाचे संपर्कप्रमुख खासदार गजानन किर्तीकर यांनी मंगळवारी कार्यकर्ता मेळाव्यात केला.

ठळक मुद्देशिवसेना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात स्वबळावर निवडणुकीचा नारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेसच्या दलदलीतून सुटका होण्यासाठी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे देश उभा राहिला. एनडीएची स्थापना करण्यात आली. काँग्रेसच्या भ्रष्ट राजवटीतून सुटका व्हावी म्हणून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविले. पण अहंकारी भाजपाला एनडीएची गरज भासली नाही. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने युती मोडून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप शिवसेनेचे पूर्व विदर्भाचे संपर्कप्रमुख खासदार गजानन किर्तीकर यांनी मंगळवारी कार्यकर्ता मेळाव्यात केला.पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी किर्तीकर यांचे प्रयत्न आहेत. यातूनच नागपूर शहर शिवसेनेतर्फे उत्तर नागपुरातील गुरुनानक सभागृहात पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष व माजी खासदार प्रकाश जाधव, माजी जिल्हाअध्यक्ष सतीश हरडे, माजी उपहमापौर किशोर कुमेरिया, माजी नगरसेवक बंडू तळवेकर, महिला संपर्क प्रमुख मंदाकिनी भावे, महिला आघाडीच्या शहर प्रमुख अलका दलाल, सूरज गोजे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.किर्तीकर म्हणाले, लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महापालिका निवडणुकीतही भाजपाची लाट होती. मात्र आता लाट संपली आहे. नोटाबंदी देशासाठी घातक ठरली. देशाची आर्थिक घडी विस्कळीत झाली. अनके छोटया व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या. देशात एकप्रकारची हुकूमशाही सुरू आहे. काही वर्षापूर्वी भाजपाकडे पैसा नव्हता, परंतु आता ज्या- ज्या ठिकाणी निवडणुका होतात. तेथे भाजपाकडून पैशाचा वापर केला जातो. असे असले तरी विदर्भामध्ये शिवसेनेला मजबूत पाठिंबा आहे. देशाची सूत्रे हलविणाऱ्या नागपूर शहरातही शिवसेना कमकुवत असून चालणार नाही. पक्ष बळकट करण्यासाठी बूथस्तरावर पक्ष मजबूत करा.२०१४ च्या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढूनही शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले. तर ७० ठिकाणी पक्षाचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. मतप्रवाह शिवसेनेच्या बाजूने आहे. तो पारड्यात पाडून घेण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन गजनान किर्तीकर यांनी केले.मंदिरांच्या संरक्षणासाठी शिवसेना मैदानात उतरणारन्यायालयाच्या निर्णयाला आमचा विरोध नाही. वाहतुकीला अडथळा होणारी धार्मिक स्थळे हटली पाहिजे. परंतु रहदारीला अडथळा नसलेली लोकांचे श्रद्धास्थान असलेली मंदिरे हटविण्याचे काम सुरू आहे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असूनही मंदिर वाचविण्यासाठी अध्यादेश काढला जात नाही. जेव्हा-जेव्हा निवडणुका येतात तेव्हा-तेव्हा भाजपाला रामाची आठवण येते. आता त्यांच्याच राजवटीत मंदिरे तोडली जात आहे. भाजपाने नागपूर शहाराचे होत्याचे नव्हते करून टाकले आहे. मंदिरांच्या संरक्षणासाठी आता शिवसेना मैदानात उतरणार असल्याची घोषणा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष माजी खासदार प्रकाश जाधव यांनी यावेळी आपल्या भाषणातून केली. गेल्या चार वर्षाच्या काळात बेरोजगार, शेतकरी, उद्योजक यांच्यासाठी सरकारने काहीच केले नाही असे असूनही कोट्यवधी बेरोजगारांना रोजगार दिल्याचे देशाचे पंतप्रधान खोटे बोलतात, असा आरोप जाधव यांनी केला.

 

टॅग्स :Gajanan Kirtikarगजानन कीर्तीकर