शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा काँग्रेस साजरी करणार इंदिराजींची जन्मशताब्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:31 IST

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम राबविण्याचा निर्णय नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला़....

ठळक मुद्दे‘स्लाईड शो’ च्या माध्यमातून जीवन दर्शन : पुस्तकही प्रकाशित करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम राबविण्याचा निर्णय नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला़ तरुण पिढी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत इंदिराजींचे विचार पोहचविणे, त्यांनी केलेल्या कामांची माहिती पोहचविण्याची मोहीम राबविण्यात येणार असून याशिवाय विविध कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहेत.अ़ भा. काँग्रेस कमिटीचे महासचिव माजी मंत्री मुकुल वासनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत, जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक झाली. तीत माजी आमदार देवराव रडके, ज्येष्ठ नेते नाना गावंडे, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, उपाध्यक्ष रमेश जोध, महिला अध्यक्ष तक्षशिला वागधरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधील प्रमुख काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते़यावेळी राजेंद्र मुळक यांनी प्रास्ताविकातून इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष व ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले़ इंदिरा गांधी यांच्या क्रांतिकारी जीवनाचा आणि इतिहासाला कलाटणी देणाºया अनेक धाडसी निर्णयांचा आजच्या तरुण पिढीला अभ्यास व्हावा, माहिती व्हावी यासाठी तालुका पातळीवर विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत़ त्यात प्रामुख्याने वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा, परिसंवाद, व्याख्यान आदींचा समावेश राहील.या शिवाय ‘स्लाईड शो’ च्या माध्यमातून इंदिराजींचे जीवनदर्शन ग्रामस्थांना घडविण्यात येईल. विदर्भ आणि इंदिराजी यांचे नाते अतूट असून त्या सर्व आठवणींना उजाळा देण्यासाठी एक पुस्तकही प्रकाशित केले जाईल. १९ नोव्हेबर २०१७ पर्यंत हे सर्व कार्यक्रम नागपूर जिल्ह्यात राबविण्यात येणार आहेत़, असे मुळक यांनी यावेळी सांगितले.इंदिरा गांधी जन्मशताब्दीनिमित्त आयोजित होणाºया प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने सहभागी व्हा, असे आवाहन करीत या सर्व कार्यक्रमांना आपण सहकार्य करू, अशी ग्वाही मुकुल वासनिक यांनी दिली. बैठकीला संजय मेश्राम, दीपक काटोले, चंद्रपाल चौकसे, कुंदा राऊत, शिल्पा जवादे, सादिक शेख, हुकूमचंद आमधरे, शाजा सफाअत अहमद, वसंत गाडगे, सुरेश कुमरे, ज्योत्स्ना कुमरे, वैशाली मानवटकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय, सेवादल, इंटक व सर्व सेलचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावाजिल्ह्यात १४ आॅक्टोबर रोजी २८२ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यावेळी पहिल्यांदाच सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार आहे. या पार्श्वभूमिवर बैठकीत सद्यस्थिती व तयारीचा आढावा घेण्यात आला. तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या भागातील राजकीय चित्र मांडले. निवडणूक जिंकण्यासाठी कशी तयारी करावी लागेल, याबाबत सूचनाही केल्या. यावर जिल्हा काँग्रेस ग्राम पंचायत निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांना सर्वतोपरी मदत करेल, असे मुळक यांनी आश्वस्त केले.