शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सिमेंटच्या जंगलात पक्ष्यांचा अधिवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:56 IST

विविध फळा-फुलांच्या झाडावर पक्ष्यांची कलकल, फुलाफुलांवर भ्रमण करणारे फुलपाखरू, एका फांदीवरून दुसºया फांदीवर हुंदडणारी खारुताई आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाचा आवाज ऐकू यावा अशी मोकळी सकाळ ...

ठळक मुद्देजयंत तांदूळकरांचा पक्षिलळा : ४० प्रजातींच्या पक्ष्यांची भरते शाळा

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विविध फळा-फुलांच्या झाडावर पक्ष्यांची कलकल, फुलाफुलांवर भ्रमण करणारे फुलपाखरू, एका फांदीवरून दुसºया फांदीवर हुंदडणारी खारुताई आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाचा आवाज ऐकू यावा अशी मोकळी सकाळ तुम्ही एवढ्यात अनुभवल्याचे आठवते काय? सिमेंटच्या जंगलात रूपांतरित झालेल्या शहरात अशा दृश्याची कल्पना करणेही दुर्लभ झाले आहे. मात्र झिंगाबाई टाकळी येथे राहणाºया जयंत तांदूळकर यांच्या घरी मनाला प्रसन्न करणारे असे दृश्य दररोज बघायला मिळते.पक्ष्यांच्या सहवासाची प्रचंड आवड असलेल्या जयंत तांदूळकर यांनी पक्ष्यांसाठी श्रीकृष्णनगर, गोधनी रोड येथील त्यांच्या घरी एक अधिवासच निर्माण केला आहे. एक पक्षिमित्र म्हणून ओळख निर्माण झालेले तांदूळकर महालेखाकार कार्यालयात अकाऊंटंट म्हणून कार्यरत आहेत. कोराडी रोडवरील कुमटी हे त्यांचे मूळ गाव. लहानपण गावात गेल्याने निसर्गाच्या सान्निध्याचा प्रभाव त्यांच्यावर आहेच. त्यामुळे शहरात राहण्यास आले तरी तो धागा त्यांच्याशी जुळला आहे. शहरातील या घरी त्यांचे कुटुंब राहायला आले तेव्हा परिसरात चिमण्याही दिसत नसल्याने ते अस्वस्थ झाले होते. त्यांनी चिमण्यांसाठी घरी पाणी आणि धान्याची व्यवस्था केली. थोड्याच दिवसात त्याचा परिणाम दिसायला लागला. त्यांच्या घरी चिमण्यांचे आगमन सुरू झाले. एवढेच नाही तर इतरही पक्ष्यांचा किलबिलाट वाढल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीला घराच्या मागे असलेला काकांचा मोकळा प्लॉट त्यांना सोईस्कर झाला होता. या मोकळ्या जागेत त्यांनी पक्ष्यांसाठी अधिवासच निर्माण केले होते. मात्र हा प्लॉट विकल्यानंतर त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला. यावर तोडगा म्हणून त्यांनी घराच्या टेरेसवर छोट्या जागेत तशीच व्यवस्था केली. हा बदलही पक्ष्यांना भावला. धान्य आणि पाण्यासाठी असलेले भांडे त्यांनी झाडाजवळच ठेवले आहे.एका पक्षितज्ज्ञाला घरी बोलावले असता एक-दोन नव्हे तर तब्बल ४० प्रजातीचे पक्षी त्यांना आढळून आल्याचे जयंत यांनी सांगितले. त्यामुळे काही पक्ष्यांनी झाडावरच घरटी बांधली आहेत. पक्ष्यांद्वारे घरट्यामधील पिल्लांना घास भरविण्याचे दृश्य येथे बघायला मिळते. आपल्या व्यस्त दैनंदिन जीवनातही पक्ष्यांचा लळा त्यांनी सोडला नाही. ते सकाळी उठतात. पक्ष्यांसाठी ठेवलेले पाणी आणि धान्याचे भांडे ते स्वच्छ करतात. त्यानंतर त्यात नव्याने धान्य आणि पाणी ठेवतात. बाजरी, कणकी आणि गवताचे बीज असे जैविक खाद्य पक्ष्यांसाठी ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले.४० प्रजातींच्या पक्ष्यांचा समावेशबांबूच्या भांड्यात दाणे टाकल्याबरोबर सर्वात आधी सिल्व्हर बिल हा छोट्याशा घोळका येथे जमा होतो. त्यानंतर सर्वांना परिचित असलेल्या चिमण्या, मॅगपाय रॉबिन, इंडियन रॉबिन, ग्रीन बी-इटर बार्बेट, लॉफिंग डाईव्ह(भोवरी), व्हाईट ब्रॉड बुलबुल, किंगफिशर असे अनेक प्रकारचे पक्षी येथे जमा होतात. अनेक प्रकारच्या प्रवासी पक्ष्यांची भेटही येथे होत असते. एका पक्षितज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार येथे ४० प्रकारचे पक्षी येत असल्याचे तांदूळकर यांनी सांगितले. याशिवाय विविध रंगांचे फुलपाखरू, खारुताई यांचे खेळणे-बागळणे येथे नेहमीच चालते.कुटुंबात असतो उत्साहहे पक्षी दररोज घराच्या छतावर येतात व सकाळपासून त्यांचा किलबिलाट सुरू होतो. ते येतात, दाणे टिपतात, भुर्रकन उडतात, थोडे ऊन निघाले की भांड्यात ठेवलेल्या पाण्यात आंघोळ करतात. मुलांना त्यांचे विशेष आकर्षण आहे. पत्नी प्रज्ञा, आई-वडील यांचा पक्ष्यांच्या सरबराईत सहभाग असतो. या पाहुण्यांमुळे घरात एकप्रकारचा उत्साह वावरत असल्याची भावना जयंत तांदूळकर यांनी व्यक्त केली.