शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

जैवविविधता संवर्धन ईश्वरीय कार्य

By admin | Updated: March 29, 2015 02:32 IST

ईश्वराने ही सृष्टी बनविली आहे. सृष्टीतील प्रत्येक घटकाचे महत्व आहे. मानवीवृत्तीमुळे ही शृंखला तोडली जात आहे.

नागपूर : ईश्वराने ही सृष्टी बनविली आहे. सृष्टीतील प्रत्येक घटकाचे महत्व आहे. मानवीवृत्तीमुळे ही शृंखला तोडली जात आहे. त्याचा परिणाम सृष्टीवर जाणवायला लागला आहे. जैवविविधता म्हणजे सृष्टीतील जीव व वनस्पती आहेत. याच्या संवर्धनाची खरी गरज आहे. जैवविविधता नष्ट झाल्यास मानव नष्ट होईल. त्यामुळे जैवविविधतेचे संवर्धन हे ईश्वरीय कार्य आहे, असे मत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सिव्हिल लाईन परिसरात जैवविविधता मंडळाच्या राज्यस्तरीय कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) अनिलकुमार सक्सेना, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सर्जन भगत, विभागीय आयुक्त अनुपकुमार सिंग, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. दिलीप सिंह, महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे के.के. नीलम, एएसके शर्मा आदी उपस्थित होते. नष्ट होत चाललेल्या, दुर्मिळ वनस्पती व जीवाच्या रक्षणासाठी जैवविविधता मंडळ कार्य करते. मंडळाची स्थापना २०१२ मध्ये करण्यात आली असून, २०१५ मध्ये मंडळाला स्वत:चे कार्यालय मिळाले आहे. याप्रसंगी जैवविविधता मंडळाने घेतलेल्या राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेच्या पुरस्काराचे वितरण वनमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. दोन घडी पत्रिकेचीही प्रकाशन यावेळी झाले. काम करण्याची भरपूर संधीमहाराष्ट्रात जैवविविधतेची जागरूकता फार उशिरा झाली. २००८ मध्ये कायदा पारित झाला. २०१२ मध्ये मंडळाची स्थापना झाली. या क्षेत्रात फार मोठे कार्य करण्यासारखे आहे. जैवविविधता ५० हजार वर्षांपासून जुळलेली आहे. त्यासाठी लोककला, लोकसंस्कृतीच्या अभ्यासकांची गरज आहे. भरपूर काम आहे, मात्र मंडळाकडे संसाधने कमी आहे. मनुष्यबळ अपुरे आहे. निधीची तरतूद नसल्याचे प्रधान वनसंरक्षक अनिलकुमार सक्सेना यांनी वनमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले. सरकारी कार्यक्रम होऊ देऊ नकाया विभागाला निधीची कमतरता पडू देणार नाही, असा विश्वास वनमंत्र्यांनी दिला. मात्र जैवविविधता पुस्तकाबाहेर काढून लोकांमध्ये रुजविण्याचे कार्य करणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकसहभाग वाढवावा लागेल. मंडळाला आवश्यक असलेल्या १०८ कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव माझ्याकडे पाठवा, महिनाभरात मंडळाला अध्यक्ष देऊ. फक्त हा कार्यक्रम सरकारी होऊ देऊ नका. जैवविविधतेसाठी हे कार्यालय आदर्श ठरले पाहिजे, अशी भावना मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)