शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गारमेंट उद्योगाला कोट्यवधींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:08 IST

नागपूर : यावर्षीही लग्नसराई कोरोना महामारीत संपली आहे. पुढे येणाऱ्या सणांवरही कोरोनाचे संकट दिसून येत आहे. कोरोनामुळे यंदा उन्हाळ्यात ...

नागपूर : यावर्षीही लग्नसराई कोरोना महामारीत संपली आहे. पुढे येणाऱ्या सणांवरही कोरोनाचे संकट दिसून येत आहे. कोरोनामुळे यंदा उन्हाळ्यात लग्नसराई आणि अन्य सणात गारमेंटची विक्री न झाल्याने नागपुरातील गारमेंट उद्योगाला कोट्यवधींचा फटका बसला आहे.

गारमेंट उद्योगासाठी नागपूर ही विदर्भ, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशासाठी मोठी व मुख्य बाजारपेठ आहे. नागपुरात तयार झालेली शेरवानी, कुर्ता-पायजामा, टी-शर्ट, पॅन्ट, जीन्स आदींची होलसेल आणि किरकोळ भावात सर्वत्र विक्री होते. नागपुरात एक हजाराच्या आसपास लहानमोठे उत्पादक आहेत. त्यांच्याकडे अजनूही तयार गारमेंट आणि गारमेंट निर्मितीसाठी खरेदी केलेला कच्चा माल पडून आहे. यावर्षीच्या प्रारंभी अनेक उत्पादकांनी कोरोनाची चाहूल पाहून गारमेंटची निर्मिती केली नाही.

गारमेंट क्लस्टरचे प्रमुख विपुल पंचमतिया म्हणाले, नागपुरातील उत्पादक फिनिश मालासाठी संपूर्ण देशातून कच्च्या मालाची खरेदी करतात. उन्हाळ्यात लग्नसराई आणि शालेय पोषाखांसाठी उत्पादकांनी जानेवारीपासूनच कच्च्या मालाची खरेदी केली आणि गारमेंट तयार करण्यास सुरुवात केली. पण मार्च आणि एप्रिलमध्ये गारमेंटची विक्री न झाल्याने सर्व फिनिश माल पडून आहे. लग्नसराईवर बंधने आणून केवळ २५ जणांच्या उपस्थितीत लग्न करण्यास परवानगी खरेदीसाठी कुणीही येत नाहीत. लग्नसराईत लग्नापूर्वी आणि लग्नानंतरच्या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या परिधानांची खरेदी केली जाते. पण यंदा ग्राहकांकडून खरेदी झाली नाही. मालाची विक्री न झाल्याने यावर्षी उत्पादकांना लग्नसराईच्या व्यवसायावर पाणी सोडावे लागले. याशिवाय रमजान ईद सणावरही कोरोनाचे संकट आले आहे. दुकाने बंद असल्याने मुस्लिम बांधव नवीन कपड्यांची खरेदी करणार नाहीत.

उत्पादक म्हणाले, कोरोना महामारीमुळे कच्चा माल खरेदी करून फिनिश माल तयार करण्याची कोणत्याही उत्पादकांची मानसिकता नाही. कोरोना रुग्णांची संख्या कमी न झाल्यास पुढेही लॉकडाऊनची स्थिती राहणार आहे. कच्चा माल खरेदी केल्यास व्यापाऱ्यांचे पैसे आणि बँकांचे कर्ज व्याजासह परत करावे लागतील. माल विकला नाही आणि तो पडून राहिल्यास उत्पादकांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागेल. उत्पादकांच्या बैठकीत प्रत्येकाने स्वत:च्या जबाबदारीवर कच्चा माल खरेदी करून फिनिश माल तयार करावा, असे ठरले आहे. त्यामुळे कुणीही जोखीम घेण्यास तयार नाहीत.

विक्रेते म्हणाले, लॉकडाऊनमुळे दुकाने बंद असल्याने सीझनमध्ये खरेदी केलेला सर्वच माल पडून आहे. त्यामुळे पुढे विक्रेतेही नवीन गारमेंट दुकानात ठेवण्यास इच्छुक नाहीत. जुन्या मालाची विक्री सेलचे आयोजन करून करावी लागेल. त्यामुळे आर्थिक नुकसान विक्रेत्यांना होणार आहे. लॉकडाऊनमुळे व्यापारी निराश आहेत. पुढे परिस्थिती पाहून विक्रेते दुकानात गारमेंटचा भरणा करतील, असे काही विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.