शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
3
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
4
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
5
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
6
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
7
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
8
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
9
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
10
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
11
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
12
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
13
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
14
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
15
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
16
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
17
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
18
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
19
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
20
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष

बोलीभाषेचा तौलनिक अभ्यास व्हावा

By admin | Updated: January 15, 2015 00:59 IST

वऱ्हाडी, नागपुरी व झाडी बोलीचे सौंदर्य आहे. या बोलींचा तौलनिक अभ्यास व्हावा, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश विकास सिरपूरकर यांनी बुधवारी केले.

न्या. विकास सिरपूरकर : विदर्भ साहित्य संघाचा वर्धापनदिन समारंभनागपूर : वऱ्हाडी, नागपुरी व झाडी बोलीचे सौंदर्य आहे. या बोलींचा तौलनिक अभ्यास व्हावा, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश विकास सिरपूरकर यांनी बुधवारी केले. विदर्भ साहित्य संघाचा ९२ वा वर्धापनदिन समारंभ आणि वाड्मय पुरस्कार -वितरण सोहळ्यानिमित्त संघाच्या सांस्कृतिक संकुलात आयोजित कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर,संघाचे उपाध्यक्ष डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी, विश्वस्त डॉ. चंद्रशेखर मेश्राम व वामन तेलंग आदी उपस्थित होते. वाचन संस्कृती कमी होत आहे, ती वाढली पाहिजे, वाचणार नाही तर वाचाल कसे. यासाठी लोकांत वाचनाची आवड निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी विदर्भ साहित्य संघाने उपक्रम राबवावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी प्रस्ताविकातून विदर्भ साहित्य संघाच्या गौरवशाली वाटचालीवर प्रकाश टाकला. संघाच्या माध्यमातून सर्व प्रवाहांना व्यासपीठ मिळाले. विदर्भाची संस्कृती बहुभाषिक आहे. सामजिक, भाषिक सलोखा राखण्यात संघाचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मनोहर म्हैसाळकर, डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनीही विचार मांडले. संचालन शुभदा फडणवीस यांनी तर पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे ंसंचालन प्रकाश एदलाबादकर यांनी केले. प्रारंभी पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. संघाचे पदाधिकारी व साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.पुरस्कार वितरणवाङ्मय पुरस्काराचे सिरपूरकर यांच्याहस्ते वितरण करण्यात आले. यात चंद्रकांत ढाकुलकर यांना हरिकिसन अग्रवाल स्मृती पत्रकारिता, डॉ. महेंद्र भवरे यांना पां.ब. गाडगीळ स्मृती युगवाणी लेखन पुरस्कार प्रदान करण्यात आला. विजय कुवळेकर यांच्याहस्ते डॉ. भारती सुदामे यांना पु.य.देशपांडे स्मृती कादंबरीलेखन, डॉ. संध्या अमृते यांना कुसुमानिल स्मृती समीक्षालेखन, नेहा भांडारकर यांना वा. कृ.चोरघडे स्मृती कथालेखन, डॉ. तीर्थराज कापगते यांना शरच्चंद्र मुक्तिबोध स्मृती काव्यलेखन, सदानंद सिनगारे यांना गो.रा.दोडके स्मृती ललितलेखन, प्रसन्न शेंबेकर व लोकमत नागपूर आवृत्तीच्या उपवृत्तसंपादक सविता देव-हरकरे यांना नवोदित साहित्य लेखन पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, रोख, शाल व श्रीफळ असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. मिलिंद बोकील यांना शांताराम कथा, के तन पिंपळापुरे यांना ना.रा.शेंडे जन्शताब्दी विशेष साहित्य तर प्रा. म.शं.वाबगावकर यांना डॉ. मा.गो.देशमुख स्मृती साहित्य पुरस्काराची घोषणा करण्यात आली. (प्रतिनिधी)वैचारिक उदारमतवाद संपतोयमूल्यासाठी मोल मोजण्याची तयारी असेल तरच वैचारिकता प्राप्त होते. परंतु आज वैचारिक उदारमतवाद संपतोय, हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांनी केले. पदावर असल्याने माणूस शहाणा होत नाही. तो अभ्यासाने मोठा होतो. म्हणून आयुष्यात सतत शिकत राहिले पाहिजे. प्रसिद्धीच्या झगमगाटामागे धावणारे आहेत. परंतु यातून मिळणारी प्रसिद्धी फार काळ टिकत नाही, असेही ते म्हणाले.९२ वा वर्धापनदिनविदर्भ साहित्य संघाच्या गौरवशाली वाटचालीची ९१ वर्षे पूर्ण झाली असून ९२ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. यानिमित्त आयोजित वर्धापनदिन समारंभात वाङ्मय पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. के.ज.पुरोहित यांना जीवनव्रती पुरस्कार जाहीर करण्यात आला. परंतु काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाहीत.