शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रांची तस्करी करणा-या बिहारी तरुणाला नागपूरात अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 22:12 IST

नागपूर, दि.10 - शस्त्रांची तस्करी करणा-या  बिहारच्या एका तरुणासह तिघांना  पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन देशी पिस्तूल, चार मॅग्जीन आणि २४ जिवंत काडतूस जप्त करण्यात आली. गिट्टीखदान पोलिसांनी बुधवारी रात्रीपासून तो गुरुवार सकाळपर्यंत ही कामगिरी बजावली, अशी माहिती परिमंडळ दोन चे पोलीस उपायुक्त राकेश ओला यांनी आज दुपारी पत्रकार परिषदेत दिली. ...

नागपूर, दि.10 - शस्त्रांची तस्करी करणा-या  बिहारच्या एका तरुणासह तिघांना  पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन देशी पिस्तूल, चार मॅग्जीन आणि २४ जिवंत काडतूस जप्त करण्यात आली. गिट्टीखदान पोलिसांनी बुधवारी रात्रीपासून तो गुरुवार सकाळपर्यंत ही कामगिरी बजावली, अशी माहिती परिमंडळ दोन चे पोलीस उपायुक्त राकेश ओला यांनी आज दुपारी पत्रकार परिषदेत दिली. अब्दुल मन्नान (वय १९, रा. बिसनपूर असरगंज, जि. मुंगेर, बिहार) असे मुख्य शस्त्र तस्कराचे नाव असून, दीपक दारुवाला ऊर्फ दीपक प्रेमलाल मनसुरे आणि हेमराज गोपीचंद शेंडे (रा. जगदीशनगर) अशी स्थानिक आरोपींची नावे आहेत. 

बिहारचा एक तरुण शस्त्र तस्करी करतो, तो गिट्टीखदानमधील ग्वालबन्सीच्या निर्मलगंगा अपार्टमेंटजवळ शस्त्र विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गिट्टीखदान पोलिसांना बुधवारी रात्री मिळाली. त्यावरून निर्मलगंगा अपार्टमेंटच्या आजूबाजूला सापळा लावला. रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास नमूद वर्णनाचा तरुण नजरेस पडताच पोलिसांनी त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तूल, दोन मॅग्जीन आणि १४ जिवंत काडतूस सापडले. पोलिसांच्या चौकशीत त्याने आपले नाव मन्नान सांगितले. नागपुरात नियमित शस्त्र विक्रीसाठी येत असल्याचे सांगून चार दिवसांपूर्वी दीपक दारुवाला नामक तरुणाला आपण अशाच प्रकारे एक पिस्तूल विकल्याचीही माहिती त्याने दिली. दीपकचा मोबाईल नंबर मन्नानजवळ होता. त्यावरून पत्ता काढून पोलिसांनी दीपक दारुवाला ऊर्फ मनसुरेला अटक केली. त्याने मन्नानजवळून आपण नव्हे तर हेमराज शेंडे याने पिस्तूल घेतल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी हेमराजला अटक केली. त्याच्याजवळूनही पोलिसांनी एक  पिस्तूल, दोन मॅग्जीन आणि १० जिवंत काडतूसं जप्त केली.  

१५ हजारात पिस्तूल, २८० रुपयात काडतूस... 

बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात देशी बनावटीची पिस्तुले, मॅग्जीन आणि काडतुसे तयार केली जातात. या पिस्तुलांची बनावट विदेशी बनावटीच्या पिस्तुलांसारखी आहे. तेथून आपण नियमित पिस्तुलांची खेप नागपुरात आणत होतो, असे मन्नानने पोलिसांना सांगितले. १५ हजार रुपयात पिस्तूल विकत घेऊन ते नागपुरात २० हजारात विकतो, असेही तो म्हणाला. एका काडतुसाची किंमत तेथे २८० रुपये आहे. ते आपण नागपुरात ३५० रुपयात विकत होतो, असेही त्याने सांगितल्याची माहिती पोलीस उपायुक्त ओला यांनी दिली. त्याने आतापावेतो नागपुरात किती पिस्तूल, मॅग्जीन आणि काडतूस विकले, कुणाला विकले, त्याची चौकशी सुरू असल्याचेही ते म्हणाले.  

आरोपींचा पीसीआर, चिनीची शोधाशोध सुरू ... 

बिहारमधील मन्नानला नागपुरात शस्त्र तस्करी आणि विक्रीत मदत करणाºया एका आरोपीचे नाव चिनी असून, त्याचा पोलीस शोध घेत आहेत. त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलीस सांगतात. दरम्यान, अटकेतील आरोपींची न्यायालयातून तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळविण्यात आली आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली सदर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त देवळे, गिट्टीखदानचे ठाणेदार राजकमल वाघमारे, उपनिरीक्षक साजीद अहमद, हवालदार युवराज ढोले, नायक संतोष उपाध्याय, शेख आफताब, शेख इमरान, आशिष आदींनी बजावली.