शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मद्यासाठी मोठी गर्दी : विक्रेत्यांचे भरले जात आहेत गल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 01:02 IST

नागपूर शहर आणि ग्रामीण भागात सुरू असलेल्या ऑनलाईन तसेच खुल्या देशी विदेशी मद्य तसेच बीअर खरेदीसाठी मद्यपींची जवळपास प्रत्येक दुकानात मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे चांगली विक्री होत असल्याने मद्यविक्रेत्यांचा गल्ला भरला जात आहे. दुसरीकडे शासनाच्या तिजोरीतही भरभरून महसूल जमा होत आहे.

ठळक मुद्दे शासनाच्या तिजोरीतही भरभरून महसूल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहर आणि ग्रामीण भागात सुरू असलेल्या ऑनलाईन तसेच खुल्या देशी विदेशी मद्य तसेच बीअर खरेदीसाठी मद्यपींची जवळपास प्रत्येक दुकानात मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे चांगली विक्री होत असल्याने मद्यविक्रेत्यांचा गल्ला भरला जात आहे. दुसरीकडे शासनाच्या तिजोरीतही भरभरून महसूल जमा होत आहे.जिल्हाधिकारी नागपूर यांनी १४ मे २०२० रोजी मद्य दुकानांसंदर्भात दिलेल्या आदेशानुसार पोलीस आयुक्त परिक्षेत्रामध्ये वाईन शॉपमधून ऑनलाइन मद्य विक्री व बीअर शॉपीमधून बीअर विक्री तसेच ग्रामीण भागामध्ये परमिट रूम वगळून इतर परवाना प्राप्त दुकानातून मद्य विक्री सुरू आहे. नागपूर ग्रामीण भागात १६३ देशी दारूची दुकाने, १७ वाईन शॉप्स आणि १५ बीअर शॉपीमधून मद्य, बीअर विक्री सुरु आहे. या सर्वच दुकानांत मद्यपीची मोठी गर्दी होत आहे. तसेच शहरातील ७३ वाईन शॉप व ४२ बीअर शॉपीमधून होम डिलिव्हरी सुरू आहे. आज देशी / विदेशी मद्य विक्रीमधून रुपये १ कोटी २२ लाख ८८ हजार ७३३ रुपयांचा महसूल शासनास मिळाला आहे.परवाने मिळविण्यासाठी गर्दीमद्य पिण्याचा परवाना मिळावा म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात मद्यपीच्या अर्जांच्या रूपाने मोठी गर्दी झाली आहे.मंगळवारी दिवसभरात २,८४७ मद्य परवाने ऑनलाईन देण्यात आले. त्यातून रुपये २८ लाख ४७ हजार रुपयांचा महसूल उत्पादन शुल्क विभागाला मिळाला आहे.