शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

बिग बी, नाना पाटेकर लावताहेत ‘आग’!

By admin | Updated: August 31, 2016 02:21 IST

अमिताभ बच्चन, नाना पाटेकर या दिग्गज अभिनेत्यांचा आवाज ऐकायला देशभरातील प्रेक्षक कानात प्राण

नागपूर : अमिताभ बच्चन, नाना पाटेकर या दिग्गज अभिनेत्यांचा आवाज ऐकायला देशभरातील प्रेक्षक कानात प्राण आणून सज्ज असतात. परंतु याच आवाजाने नागपुरातील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची झोप उडवली आहे. काही खोडसाळ वृत्तीचे लोक अमिताभ बच्चन,नाना पाटेकर यांच्या आवाजाची नक्कल करून शहरात आग लागल्याचे कॉल करीत आहेत. अशा फेक कॉल्सचे प्रमाण इतके वाढले आहे की आता तर अग्निशमन दलाचा कर्मचारी फोन उचलायलाही घाबरत आहेत. शहरात कुठे आग लागल्यास मनपा अग्निश्मन मुख्यालयाच्या १०१ या आपातकालीन फोन नंबरवर फोन केले जातात. परंतु काही खोडसाळ मंडळी या क्रमांकावर टाईमपासाठी फोन करून कर्मचाऱ्यांची थट्टा करीत असतात. फोन महत्त्वाचा असेल म्हणून तो टाळता येत नाही आणि फोन उचलला तर पलिकडून कधी नाना पाटेकर तर कधी अमिताभ बच्चन यांचे नाव सांगितले. कधीकधी तर चक्क ‘मी विजय दीनानाथ चव्हाण बोलतो. माझ्या मांडवा गावात आग लागली आहे’, असे डॉयलॉगही ऐकायला येतात. या प्रकाराचा विरोध केला तर फोन करणारे अश्लील शिवीगाळ करतात. रात्री-बेरात्री कधीही असे कॉल्स येत असल्याने अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे. (प्रतिनिधी) महत्त्वाच्या नंबरचा दुरुपयोग ४संकटकालीन स्थितीत लवकर मदत मिळावी म्हणून कोणत्याही शहरात १००, १०१ हे फोननंबर महत्त्वाची भूमिका वठवत असतात. परंतु या क्रमांकावर जनतेला सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांशी अशी अक्षम्य थट्टा केली जात आहे. अशा खोडसाळणामुळे येणाऱ्या प्रत्येक कॉलकडे शंकेने बघितले जात आहे. पोलिसात तक्रारीचा उपयोगच नाही ४याबाबत अग्निशमन विभागाचे अधिकारी राजेंद्र उचके यांनी सांगितले की, आम्ही या प्रकाराची तक्रार पोलिसात केली होती. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. असा खोडसाळपणा करणाऱ्या तरुणांमध्ये प्रगल्भतेचा अभाव आहे. परंतु याचा फटका ज्याला खरेच मदतीची गरज अशा लोेकांना बसू शकतो. अशा प्रकारचे फोन कॉल्स मोमिनपुरा आणि टिमकी क्षेत्रातून येत असल्याची माहिती असून त्या दिशेने तपास केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.