शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपटाच्या शुटिंगसाठी ‘बिग बी’ नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 12:53 IST

झोपडपट्टीतील हजारो मुलांना खेळाची नवी दिशा दाखविणाऱ्या नागपूरच्या ‘स्लम सॉकर’वर आधारित चित्रपटाच्या शुटिंगला उपराजधानीत सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देचाहत्यांमध्ये उत्साह‘स्लम सॉकर’फेम विजय बारसेंवर चित्रपटाची कथा आधारित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झोपडपट्टीतील हजारो मुलांना खेळाची नवी दिशा दाखविणाऱ्या नागपूरच्या ‘स्लम सॉकर’वर आधारित चित्रपटाच्या शुटिंगला उपराजधानीत सुरुवात झाली आहे. ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांची या चित्रपटात भूमिका असून ते सोमवारी सकाळी नागपुरात दाखल झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली. फुटबॉलच्या माध्यमातून अनेक गरीब व झोपडपट्टीतील तरुणांचे आयुष्य बदलविणारे नागपूरचे क्रीडा संघटक व फुटबॉल प्रशिक्षक प्रा. विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट राहणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे हे ‘झुंड’ नावाच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाच्या रूपाने नागपूरची ओळख आता ‘बॉलिवूड’मध्येदेखील प्रस्थापित होणार आहे.सकाळी ११.३० च्या सुमारास मुंबईहून अमिताभ बच्चन यांचे चार्टर्ड विमानाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. मोहननगरातील एका शाळेच्या परिसरात चित्रपटाचा ‘सेट’ उभारण्यात आला आहे. ‘बिग बी’ येथे जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान ते नेमके किती दिवस नागपुरात असतील याबाबत नेमकी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.कोण आहेत विजय बारसे ?हिस्लॉप महाविद्यालयात शारीरिक शिक्षक राहिलेले प्रा. बारसे यांनी क्रीडा विकास मंचच्या माध्यमातून झोपडपट्टीतील तरुणांसाठी फुटबॉल स्पर्धा आयोजित करून त्यांना व्यासपीठ मिळवून दिले. ‘स्लम सॉकर’चे प्रणेते अशी त्यांची ओळख आहे. वाईट मार्गाला गेलेल्या अनेक तरुणांना त्यांनी मुख्य प्रवाहात आणले. बारसेंच्या प्रशिक्षणाखाली घडलेल्या शेकडो फुटबॉलपटूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमक दाखवून नागपूर व देशाला नावलौकिक मिळवून दिला. शिवाय राज्यभरात ‘स्लम सॉकर’ला तरुणांनी डोक्यावर घेतले. 

टॅग्स :Amitabh Bachchanअमिताभ बच्चन