देवलापार : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली माेटरसायकल वळणावर स्लीप झाली. यात खाली काेसळल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील हरणाकुंड (ता. रामटेक) शिवारात शनिवारी (दि. १३) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली.
साेनू श्रीपत सिरसाम (२२, रा. काेहका-टुरिया, जिल्हा शिवणी, मध्य प्रदेश) असे मृत तरुणाचे नाव आहे. ताे एमएच-४०/सीबी-१८८३ क्रमांकाच्या माेटरसायकलने छवारी (ता. रामटेक) येथे आला हाेता. काम आटाेपल्यानंतर गावाला परत जाताना हरणाकुंड शिवारातील वळणावर त्याचा वेगात असलेल्या माेटरसायकलवरील ताबा सुटला. त्यामुळे माेटरसायकल स्लीप झाल्याने ताे खाली काेसळला. यात त्याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घाेषित केले. उत्तरीय तपासणी प्रक्रिया आटाेपल्यानंतर मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी देवलापार पाेलिसांनी नाेंद करून तपास सुरू केला आहे.