नागपूर : दक्षिण नागपुरातील प्रभाग क्रमांक ४६, रमणा मारोती येथील पवनसुत नगरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात सांस्कृतिक सभागृहाच्या बांधकामासाठी आमदार निधीतून ६० लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. या सभागृहाचे भूमिपूजन आमदार दीनानाथ पडोळे यांच्याहस्ते पार पडले. पवनसुत नगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे एक महत्त्वपूर्ण देवस्थान आहे. याठिकाणी दरवर्षी होणाऱ्या उत्सवात मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी होतात. मात्र मंदिर परिसरात सोयीसुविधेचा अभाव असल्याने भाविकांना अडचणीचा सामना करावा लागतो. येथे एका सांस्कृतिक सभागृहाची निर्मिती व्हावी, यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर मित्र मंडळ, शनिमंदिर व्यवस्थापन मित्र मंडळ, श्रमिक कॉलनी, पवनसुत नगर मित्र मंडळ, चिटणीस नगर नागरिक मंडळ, आदर्शनगर मित्र मंडळ, धन्वंतरी नगर मित्र मंडळ यांनी आमदार पडोळे यांचेकडे मागणी केली होती़ नागरिकांच्या मागणीचे महत्त्व व उत्सवाचे वेळी नागरिकांना होत असलेल्या अडचणी लक्षात घेऊ न आमदार महोदयांनी यावर सकारात्मक विचार करुन, त्यांना प्राप्त झालेल्या विशेष निधीतुन ६० लाखाचा निधी सांस्कृतिक सभागृहाच्या बांधकामास मंजूर करून दिला़ त्यामुळे मंडळाने सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन करण्याचा निर्णय घेतला. आमदार पडोळे यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी अशोक हेमके व शिवाजी चाफले यांनी आमदार पडोळे यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ते म्हणाले की, आम्ही एका छोट्या समाज भवनाची अपेक्षा करीत होतो व त्याची मागणी करीत होतो. परंतु आमदार महोदय आम्हाला ५००० चौरस फुटाचे मोठे सांस्कृतिक सभागृहाची वास्तू बांधून देत आहे़ हे आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे, याचा आम्हाला अभिमान आहे़ यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्या प्रीती कदम यांचेही आभार मानले़ याप्रसंगी आमदारांनी सांगितले की, काही रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण झाले आहे व काही प्रस्तावित आहेत़ सभागृहाचे बांधकाम रुक्मिणी मंदिर व शनिमंदिर पंच कमिटी यांचे देखरेखीखाली करावे व बांधकाम होत असतांना छोट्या-मोठ्या गोष्टींकडे लक्ष ठेवावे़ ही वास्तू आपल्या सगळ्यांची असून याचा वापर आपल्या सगळ्यांना करावयाचा आहे़ येथे धार्मिक कार्यक्रम, प्रवचन व दरवर्षी होणाऱ्या महाप्रसादामध्ये या भवनाचा लाभ मिळेल़याप्रसंगी काँगे्रस सेवादलाचे अध्यक्ष रामगोविंद खोब्रागडे, एकनाथजी काळमेघ, विजय कदम, घनश्याम भेंडे, परमेश्वर राऊत, प्रशांत आस्कर, राजू पलांदूरकर, शंकरराव महल्ले, गजानन कुबडे, अशोक कुकडे, सोनु ठाकरे, विजय कुकडे, गज्जु देवगडे, प्रमोद यादव, अरविंद गुरव, नितीन ठाकरे, विजय पराते, शंकर मौर्य, ज्ञानेश्वर महल्ले, गजू रणदिवे, राजू सोनारे, राजू गहुकर, मोरेश्वर सावरकर, गणपत महल्ले, शोभा कुकडे, दीशा कुकडे, नासुप्रचे अधिकारी- देशपांडे,तांबेकर व राऊत उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
रमणा मारोती प्रभागात सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन
By admin | Updated: August 25, 2014 01:12 IST