शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
3
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
4
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
5
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
6
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
7
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
8
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
9
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
10
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
11
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
12
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
13
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
14
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
15
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
16
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
17
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
18
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
19
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
20
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई

इंदू मिलच्या स्मारकाचे भूमिपूजन आॅक्टोबरपूर्वी

By admin | Updated: April 19, 2015 02:19 IST

मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन आॅक्टोबर महिन्यात..

नागपूर : मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन आॅक्टोबर महिन्यात म्हणजे धम्मचक्र प्रवर्तनदिन वर्धापनदिनापूर्वी करण्याचा सरकारचा मानस आहे, असे सामाजिक न्यायखात्याचे मंत्री राजकुमार बडोले यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष सामाजिक समता वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यानिमित्त राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती बडोले यांनी दिली. मुंबईच्या इंदू मिलच्या जागेवर होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनाकडे त्यांचे लक्ष वेधले असता बडोले म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यावर या प्रक्रियेला गती आली आहे. जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. आॅक्टोबरपर्यंत म्हणजे धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या वर्धापनदिनापूर्वी भूमिपूजन करण्याचा सरकारचा मानस आहे. काँग्रेसने इंदू मिलमध्ये केलेल्या प्रतिकात्मक भूमिपूजनासंदर्भात बडोले म्हणाले की, काँग्रेसकडून हा श्रेय लाटण्याचा प्रकार आहे.स्मारक व्हावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत.(प्रतिनिधी)सामाजिक समता वर्षसामाजिक समता वर्षाच्या निमित्ताने विविध योजना राबविण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती वाटपातही पारदर्शकता आणण्यात येईल. ज्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळत नाही त्यापैकी काहींचा विचार शिष्यवृत्तीसाठी केला जाईल. संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेचे अनुदान वाटप बायोमेट्रिक पद्धतीने केले जाईल आणि जात वैधता प्रमाणपत्राचे कक्ष प्रत्येक जिल्ह्यात या महिन्यात सुरू होईल, असे बडोले म्हणाले. लंडनमध्ये होणार स्मारकलंडनमध्ये ज्या घरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य होते ते घर खरेदी करून तेथे स्मारक उभारण्यात येणार आहे. या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बडोले यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती २३ ला लंडनला जाणार आहे. यासंदर्भात माहिती देताना बडोले म्हणाले की, येथे संग्रहालय आणि वाचनालय सुरू करण्याचा विचार आहे. त्याचप्रमाणे लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चेअर स्थापन करणे, त्याचप्रमाणे आंबेडकर यांच्या नावाने फेलोशिप सुरू करण्यात येणार असून, लंडनमध्ये राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा सरकारचा मानस आहे. या घराची किंमत सरासरी ४० कोटी ठरण्याची शक्यता आहे. यासाठी सॉलिसिटरची नियुक्ती करण्यात आली आहे. तेथे स्मारक उभारल्यावर त्याची देखभाल- दुुरुस्ती कोणी करावी, यासंदर्भातही चर्चा सुरू आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर लंडनमध्ये गेल्यावर चर्चा केली जाईल.