शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

भूसुरूंग स्फोटात ९ वर्षात ४९ पोलीस जवान ठार

By admin | Updated: May 13, 2014 00:23 IST

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी लावलेल्या भूसुरूंग स्फोटात २00५ पासून आतापर्यंत ४९ पोलीस जवान शहीद व १८ लग्न वर्‍हाडी ठार झाले आहेत.

अभिनय खोपडे - गडचिरोली

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी लावलेल्या भूसुरूंग स्फोटात २00५ पासून आतापर्यंत ४९ पोलीस जवान शहीद व १८ लग्न वर्‍हाडी ठार झाले आहेत.

नक्षलवाद्यांनी २ फेब्रुवारी २00५ मध्ये भामरागड तालुक्याच्या धोडराज पोलीस मदत केंद्रांतर्गत भामरागड, लाहेरी मार्गावर भूसुरूंग स्फोट केला होता. या स्फोटात आठ पोलीस जवान शहीद झाले होते. या ठिकाणी पामुलगौतम नदीच्या पूलाचे बांधकाम सुरु होते. त्यानंतर ६ जून २00५ मध्ये मालेवाडाजवळ नवेझरी येथे पोलीस दलाचे वाहन नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोटात उडविले होते. या स्फोटात पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर वाघाडे, पोलीस जमादार चुन्नीलाल जांभुळकर व वाहन चालक घनश्याम टेकाम जात असलेले एमएच ३३-६३९३ क्रमांकाचे वाहन ७५ किलो जिलेटीनचा स्फोट करून नक्षलवाद्यांनी उडविले होते. या घटनेत तीन पोलीस शहीद झाले होते. १५ मे २00६ ला मुलचेरावरून छत्तीसगड राज्याच्या पाखांजूरकडे लग्न वर्‍हाड घेऊन जाणारे महिंद्रा गामा वाहन क्रमांक सीजी 0४ एमएच ३0९३ हे वाहन नक्षलवाद्यांनी उडविले. यात १२ लग्न वर्‍हाडी ठार झाले होते. ५ मे २0११ ला धानोरा तालुक्यातील येरकडजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोट घडविला होता. यात टाटा सूमो गाडीतून जाणारे ६ लग्न वर्‍हाडी ठार झाले होते. २७ मार्च २0१२ रोजी धानोरा तालुक्यातील पुस्टोला गावाजवळ भूसुरूंग स्फोट घडवून नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाची मिनीबस उडविली. यात १३ जवान शहीद झालेत. त्या घटनेनंतर ११ मे २0१४ ला चामोर्शी तालुक्यातील मुरमुरी गावाजवळ नक्षलवाद्यांनी पोलिसांची सुमो उडविली. यात ७ पोलीस जवान शहीद झालेत.

जिल्ह्यात २00९ नंतर केंद्रीय राखीव पोलीस दलाचे बटालियन तैनात करण्यात आले. या सीआरपीएफच्या जवानानांही नक्षलवाद्यांनी टार्गेट करीत हानी पोहोचविली आहे. २0१२ मध्ये सिव्हीक अँक्शन कार्यक्रमासाठी जाणार्‍या सीआरपीफच्या मिनी बसला नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोटात उडविले होते. यात १३ जवान शहीद झाले होते.