शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
4
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
5
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
6
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
7
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
8
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
9
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
10
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
12
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
13
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
14
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
15
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
16
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
17
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
18
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
19
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
20
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले

भोला, राजमंगल अन् राणी तूर्त रेशीमबागेतच राहणार

By admin | Updated: January 6, 2015 01:05 IST

तीन हत्तींना अवैधरीत्या नागपुरात आणल्यावरून वन विभागाने जप्त केले. परंतु हे हत्ती आपल्या माहुतांशिवाय खात नसल्याने त्यांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी पारवानी यांच्या न्यायालयाने

नागपूर : तीन हत्तींना अवैधरीत्या नागपुरात आणल्यावरून वन विभागाने जप्त केले. परंतु हे हत्ती आपल्या माहुतांशिवाय खात नसल्याने त्यांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी पारवानी यांच्या न्यायालयाने तूर्त माहुतांच्या ताब्यात दिले आहे. १० जानेवारी रोजी त्यांना नेमके वन विभागाच्या की माहुतांच्याच ताब्यात द्यायचे, हे निश्चित होणार आहे. या हत्तींपैकी दोन हत्ती आणि एक हत्तीणी आहे. भोला, राजमंगल आणि राणी, अशी त्यांची नावे आहेत. त्यांना उत्तर प्रदेशच्या हमीदपूर भागातून नागपुरात आणण्यात आले होते. रेशीमबागेत पंचकल्याणक महा महोत्सव सुरू असून, त्यांना मिरवणुकीत सहभागी करण्यात येणार होते. अचानक पीपल्स फॉर अ‍ॅनिमल नावाच्या एनजीओने वन विभागाकडे तक्रार केली आणि वन विभागाने या तिन्ही हत्तींना ताब्यात घेतले. हत्तींचा वन्यप्राण्यांच्या अनुसूची क्रमांक १ मध्ये समावेश होतो. त्यामुळे त्यांच्या वाहतुकीचा परवाना (ट्रान्झिट पास) अत्यावश्यक असते. हत्तींना सांभाळणाऱ्या माहुतांकडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची ट्रान्झिट पास नव्हती. तातडीने मालक इद्रीस अहमद बद्रुद्दीन याला बोलावण्यात आले. त्याच्याकडे तर या तिन्ही हत्तींचे मालकीहक्कही नव्हते. त्यामुळे हत्तींना जप्त करून इद्रीस याला अटक करण्यात आली. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची २५ हजाराच्या जामिनावर सुटका केली. हत्ती माहुतांशिवाय खात नसल्याने त्यांना तूर्त रेशीमबाग येथेच ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. (प्रतिनिधी)