शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
3
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
4
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
5
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
6
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
7
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
8
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
9
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
10
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
11
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
12
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
13
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
14
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
15
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
16
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
17
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
18
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
19
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
20
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या

बुटीबोरी येथील कारवाईचे भिवापूर कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:08 IST

भिवापूर : वाघांच्या दातांची तस्करी करणाऱ्या चार आरोपींना गत २७ ऑगस्ट रोजी नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील एका ढाब्यावर अटक करण्यात आली. ...

भिवापूर : वाघांच्या दातांची तस्करी करणाऱ्या चार आरोपींना गत २७ ऑगस्ट रोजी नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील एका ढाब्यावर अटक करण्यात आली. यातील चारपैकी दोन आरोपी अभयारण्य प्रभावित भिवापूर तालुक्यातील आहेत. बुटीबोरी येथील कारवाई करणाऱ्या वन विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) सकाळच्या सुमारास शहरातील पुन्हा एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. बुटीबोरी कारवाईचे हे भिवापूर कनेक्शन एक ना अनेक प्रश्न उभे करणारे आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारावर नागपूर वन विभाग व बुटीबोरी वन परिक्षेत्र विभागाच्या संयुक्त पथकाने गत २७ ऑगस्ट रोजी सापळा रचून नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील अपना पंजाब ढाबा येथून वाघांच्या दातांसह परसराम नंदू बिजवे (३६, रा. तास), गणेश देविदास रामटेके (२८, रा. बोर्डकाल (दोघेही रा. ता. भिवापूर), विजय हरीभाऊ वाघ (३२) बुटीबोरी, दिक्षानंद दिलीप राऊत रा. मसाळा यांना अटक केली होती. त्यांच्याकडून एम.एच.- ४० ए.डी.-९१५२ व एम.एच.-४०- ए.डबल्यू.-२७८३ या दोन दुचाकीही जप्त करण्यात आल्या होत्या. या चारही आरोपींपैकी परसराम बिजवे व गणेश रामटेके हे भिवापूर तालुक्यातील आहेत. हे दोघेही घटनेच्या दिवशी एकाच दुचाकीने बुटीबोरी येथे गेले होते. भिवापूर तालुका जंगलव्याप्त आहे. उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याचा अर्ध्याहून अधिक भाग भिवापूर तालुक्यातीलच आहे. त्यामुळे परिसरात वाघ, बिबटे व इतर वन्य प्राण्यांचा कायम मुक्त संचार असतो. यापूर्वी तालुक्यात वाघ, बिबट्याची शिकार आणि तस्करीच्या अनेक घटना उजेडात आल्या आहे. या तस्करीत स्थानिक आरोपींचा सहभाग स्पष्ट झाला आहे. अशात बुटीबोरी येथील कारवाईत पुन्हा भिवापूर तालुक्याचे कनेक्शन जुडल्याने खळबळ उडाली आहे. वाघांच्या दातांची तस्करी असल्यामुळे आरोपींनी किंवा त्यांच्या संपर्कातील व्यक्तींनी कुठेतरी वाघाची शिकार केली यात शंका नाही. मात्र, ही शिकार कुठे आणि कोणी केली, या तस्करीतील वाघांच्या दातांचे थेट कऱ्हांडला अभयारण्याशी तर संबंध नाही ना, याचा शोध घेणे आवश्यक आहे. असे असल्यास आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

अधिकारी सकाळीच भिवापुरात

२७ ऑगस्ट रोजी बुटीबोरी येथे वाघांच्या दातांसह चार आरोपींना अटक केल्यानंतर प्रथम न्यायदंडाधिकारी, नागपूर यांनी ३ सप्टेंबर पर्यंत आरोपींना वन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर बुधवारी (दि.१) सकाळी ६ वाजताच्या सुमारास बुटीबोरी वन विभागाचे पथक भिवापूर येथे धडकले. या पथकाने शहरातील अन्य एकास चौकशीसाठी ताब्यात घेत त्याला बुटीबोरी येथे घेऊन गेले. याबाबत पोलीस ठाण्यामध्ये नोंदही करण्यात आली आहे.

-

आरोपीची संख्या वाढणार?

या कारवाईत सध्या केवळ वाघांचे दात वन विभागाच्या हाती लागले आहेत. त्यामुळे वाघाची शिकार कुठे झाली, कातडे, नखे, मिशा आदींचा शोधही वन विभाग घेत आहे. महत्त्वाचे म्हणजे शिकार ते तस्करी या संपूर्ण प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असून यात भिवापूर शहरातील आणखी दोघांवर वनविभागाची नजर असल्याची चर्चा आहे. या कारवाईमुळे शहरातील काहींच्या हालचालीसुध्दा संशयास्पद आहेत.

-

गेला ‘जय’ कुणीकडे?

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील ‘जय’ नामक वाघाने जगभरातील पर्यटकांना भुरळ घातली होती. हाच भारदस्त देखणा ‘जय’ अचानक बेपत्ता झाला. राज्यात आणि बाहेरराज्यातही शोध घेतला गेला. मात्र, तीन ते चार वर्षांचा कालखंड उलटूनही त्याचा पत्ता लागलेला नाही. उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात अशा एक ना अनेक संशयास्पद घटना घडल्या. त्यामुळे बुटीबोरी येथील तस्करीच्या घटनेने कऱ्हांडला अभयारण्याकडेही बोट दाखविले जात आहे.