लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली कार वळणावर असलेल्या इमारतीच्या भिंतीवर आदळली. यात कुणालाही दुखापत झाली नसली तरी कार व भिंतीचे नुकसान झाले आहे. ही घटना वाडी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील दाभा परिसरात साेमवारी (दि. २९) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. कारचालकास अटक करण्यात आल्याची माहिती ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांनी दिली.
प्रशांत सावरकर, रा. जुना फुटाळा, विद्यापीठ परिसर, अमरावती राेड, नागपूर असे अटक करण्यात आलेल्या कारचालकाचे नाव आहे. ताे साेमवारी सायंकाळी एमएच-३१/एफई-८८९७ क्रमांकाच्या कारने दाभा परिसरातून सुसाट जात हाेता. ही बाब लक्षात येताच एमआयडीसी पाेलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेच्या पथकाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने कारचा वेग कमी न करता वाढवला आणि पळ काढला.
त्यातच त्याचा कारवरील ताबा सुटला आणि ती कार वळणावरील दारूच्या दुकानाजवळ असलेल्या चहाच्या दुकानाच्या भिंतीवर आदळली. त्यात कार व भिंतीचे नुकसान झाले. शिवाय, त्याला फारशी दुखापत झाली नाही. वाहतूक शाखेचे पाेलीस निरीक्षक राजेंद्र पाठक यांनी त्याला लगेच ताब्यात घेतले. ताे दारू प्यायलेला हाेता, अशी माहितीही पाेलिसांनी दिली. या प्रकरणी वाडी पाेलिसांनी वाहतूक शाखेच्या सहायक पाेलीस निरीक्षक गाेपिका काेडापे यांच्या तक्रारीवरून भांदवि २७९, ४२७ अन्वये गुन्हा नाेंदवित त्याला अटक केली. घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक जी. ए. माेघे करीत आहेत.