शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमी स्मारक समितीच्या अध्यक्षपदी भंते सुरेई ससाई

By admin | Updated: September 20, 2015 03:03 IST

केरळ आणि बिहार राज्याचे माजी राज्यपाल दिवंगत रा.सू. गवई यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या दीक्षाभूमीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अध्यक्षपदी भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई ..

स्मारक समितीच्या बैठकीत निर्णय : एकमताने झाली निवड नागपूर : केरळ आणि बिहार राज्याचे माजी राज्यपाल दिवंगत रा.सू. गवई यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या दीक्षाभूमीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अध्यक्षपदी भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांची निवड करण्यात आली आहे.शनिवारी डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील स्मारक समितीच्या सभागृहात स्मारक समितीची बैठक पार पडली. बैठकीच्या सुरुवातीला समितीचे अध्यक्ष दिवंगत रा.सू. गवई यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. आजच्या समितीचा मुख्य विषय हा अध्यक्षपदाच्या निवडीचाच होता. स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांनी भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचे नाव प्रस्तावित केले.तर डॉ. राजेंद्र गवई यांनी अनुमोदन केले. त्यानंतर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांच्यासह सर्व सदस्यांनी भंते ससाई यांची एकमताने निवड केली. याप्रसंगी भंते ससाई यांनी सर्वांचे आभार व्यक्त करीत दीक्षाभूमीची महत्त्वाची जबाबदारी आपण योग्यपद्धतीने पर पाडू, असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे सदस्य पुरुषोत्तम भागवत, मामा येवले, विजय चिकाटे, आनंद फुलझेले, सुधीर फुलझेले, , डी.जी. दाभडे आणि एन. आर. सुटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)