शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

भंडारा-गोंदिया, पुसदला वादळाचा तडाखा

By admin | Updated: June 13, 2014 01:27 IST

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर, गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात आणि यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात झालेल्या वादळी पावसादरम्यान घरांच्या छतावरील कवेलू, टिनपत्रे उडून गेले. झाडे उन्मळून पडली

भंडारा/गोंदिया/पुसद : भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर, गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात आणि यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात झालेल्या वादळी पावसादरम्यान घरांच्या छतावरील कवेलू, टिनपत्रे उडून गेले. झाडे उन्मळून पडली असून विद्युत खांबेसुद्धा कोलमडून पडली आहेत. याशिवाय मळणी केलेली उन्हाळी धानाची पोती भिजल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. लाखांदूर तालुक्यातील ३५ गावातील घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कऱ्हांडला येथील गिरीश मेश्राम यांच्या राईस मिलचे गोदाम भुईसपाट झाले आहे. गोदाम परिसरातील भिंत प्रभाकर मेश्राम यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरवर कोसळले. या पावसामुळे १६ टन तांदळाचा चुराडा झाला. यासह ३५ गावातील नुकसान कोट्यवधीत झाले आहे.गोंदिया जिल्ह्यात कवलेवाडा येथे पाच घरे अंशत: पडली असून त्यात २७ हजार तर तीन गोठे पडल्याने दोन लाख ७७ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. इसाटोला येथे १९ घरे अंशत: पडली असून त्यात ६५ हजार रूपयांचे तर दोन गोठे पडून ५८ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. तर सहारवानी येथे २५ घरे अंशत: पडली असून यात एक लाख २५ हजार रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. पुसद शहरासह परिसरात गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. वादळाच्या तडाख्यात विजेचे खांब जमिनदोस्त झाले. वृक्ष उन्मळून पडल्याने अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक बंद झाली होती. पहिल्याच पावसात शहरातील रस्त्यांवर पाणी तुंबले होते. यातून नगरपरिषदेने केलेले पावसाळ्यापूर्वीचे नियोजन पार कोलमडल्याचे दिसून आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)