शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 19:39 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गुडधे यांची जनहित याचिका नाकारून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा केला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय : कायद्यानुसार सहा महिन्यांत निवडणूक घेणे बंधनकारक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गुडधे यांची जनहित याचिका नाकारून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा केला.लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम १५१-ए अनुसार लोकप्रतिनिधीची जागा रिक्त झालेल्या मतदार संघात सहा महिन्यांत निवडणूक घेणे बंधनकारक आहे. तसेच, सर्वसाधारण निवडणुकीला एक वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक असल्यास पोटनिवडणूक घेणे टाळता येते. परंतु, लोकसभेच्या आगामी सर्वसाधारण निवडणुकीला एक वर्षापेक्षा जास्त काळ बाकी आहे. परिणामी, भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणूक थांबविली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांनी हा निर्णय दिला.१० एप्रिल २०१४ रोजी लोकसभेची सर्वसाधारण निवडणूक झाली होती. त्याचा निकाल १६ मे २०१४ रोजी जाहीर करण्यात आला होता. भंडारा-गोंदिया मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन उमेदवार नाना पटोले विजयी झाले होते. पटोले यांनी ८ डिसेंबर २०१७ रोजी खासदारकीचा राजीनामा दिला व तो राजीनामा १४ डिसेंबर २०१७ रोजी मंजूर झाला. त्यामुळे या मतदार संघात पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. परंतु, आगामी सर्वसाधारण निवडणूक २०१९ मध्येच असल्यामुळे आता पोटनिवडणूक घेऊ नये, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. या मतदार संघाची एकूण लोकसंख्या २१ लाख ९० हजार १० असून, संघात सहा तालुक्यांचा समावेश आहे. या मतदार संघातील गेल्या निवडणुकीत ६ कोटी २८ लाख ८६ हजार रुपये खर्च झाले होते. वाढलेल्या महागाईमुळेपोटनिवडणुकीवर यापेक्षा जास्त खर्च होईल. त्यानंतर काही महिन्यांतच होऊ घातलेल्या सर्वसाधारण निवडणुकीतही कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतील. हा सार्वजनिक निधीचा अपव्यय ठरेल, असे याचिकाकर्त्याने स्पष्ट केले होते. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अनिल किलोर तर, भारतीय निवडणूक आयोगातर्फे अ‍ॅड. नीरजा चौबे यांनी कामकाज पाहिले.प्रतिवादींची भूमिका लक्षात घेतलीन्यायालयाने पहिल्या सुनावणीनंतर भारतीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग व गोंदिया जिल्हाधिकारी या प्रतिवादींना नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला होता. हा निर्णय देताना प्रतिवादींची भूमिका लक्षात घेण्यात आली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयElectionनिवडणूक