शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांना भालचंद्र मुणगेकरांचे खुले पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 16:06 IST

ख्यातनाम साहित्यिक नयनतारा सहगल यांच्या यवतमाळमधील साहित्य संमेलनातील उपस्थितीवरून निर्माण झालेल्या वादळाबाबत ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी पत्र पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: ख्यातनाम साहित्यिक नयनतारा सहगल यांच्या यवतमाळमधील साहित्य संमेलनातील उपस्थितीवरून निर्माण झालेल्या वादळाबाबत ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी पत्र पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

यात ते म्हणतात, आदरणीय, श्रीमती अरुणाताई ढेरे,सादर प्रणाम.प्रत्येक वर्षी कोणत्या त्या कोणत्या भानगडीत अडकलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी या वर्षी आपली बिनविरोध निवड झाली. ही मराठी जणांना सुखावणारी गोष्ट आहे.परंतु यावेळी, साहित्य अकादमी सन्मानपात्र ख्यातनाम साहित्यिका श्रीमती नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण संयोजकांनी अचानक रद्द केले आणि भानगडींची परंपरा सुरु ठेवली.सहगल याचे निमंत्रण रद्द केल्यानंतर मराठी साहित्य-विश्वात निर्माण झालेल्या वादळाची आपल्याला कल्पना आहे. सहगल इंग्रजी भाषिक साहित्यिक आहेत, म्हणून त्या आल्यास संमेलनात गोंधळ घालू,हे कारण सांगून काही  झुंडशाही प्रवृत्तींनी दिलेल्या धमकीमुळे त्यांचे निमंत्रण रद्द करण्यात आले. खरे कारण, सेहगल एक संवेदनशील साहित्यिका असल्यामुळे त्या देशातील प्रचलित वाढत्या असहीश्नुतेवर भाष्य करणार होत्या, हे आहे.आता संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून याबाबत आपली भूमिका महत्वाची आहे.आपल्या साहित्य-सेवेबद्दल आदर आणि कृतज्ञता म्हणून,साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा, आणि तो ही बिनविरोध, सन्मान आपल्याला मिळालाच आहे. आता संमेलनाच्या मंचावरून अध्यक्षीय भाषण करणे, हा एक औपचारिकपणा आहे. न्या. महादेव गोविंद रानडे यांच्याकडून मराठी साहित्याविषयी जाणिवा घेतलेल्या माज्या सारख्याला या औपचारिकपणाचे महत्त्व ठावूक आहे. परंतु कोणत्याही कारणामुळे, प्रचलित परिस्थितीत आपण संमेलनास उपस्थित राहून अध्यक्षीय भाष्य केल्यास कणाहीन संयोजाकांप्रमाणेच आपणही असहिष्णुता आणि झुंडशाहीसमोर शरण गेल्यासारखे होईल. भारतातील उदारमतवादाचे जनक असलेल्या युगपुरुष न्या. रानडे यांच्या विचारविश्वाशी ती प्रतारणा ठरेल.आपल्या सद्सदविवेकबुद्धीवर माझा विश्वास आहे. आपला,डॉ. भालचंद्र मुणगेकरयवतमाळच्या संमेलनाचे उदघाटन कोण करणार याबाबतचा तिढा अद्यापी सुटलेला नाही. उदघाटक म्हणून कोणाला बोलवावे, याबाबत काही नावे सुचवण्याचे आवाहन साहित्य महामंडळाकडून आयोजक संस्थेला करण्यात आले. आयोजक समितीकडून ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, लोकमत समूहाच्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार आणि ज्येष्ठ कवी विठठल वाघ ही तीन नावे महामंडळाकडे पाठवण्यात आली आहेत.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन