शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघातात तीन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 00:40 IST

भरधाव ट्रॅव्हल्सने आॅटोला दिलेल्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्देचौघे जखमी : ट्रॅव्हल्सची आॅटोला धडक

लोकमत न्यूज नेटवर्कसावनेर : भरधाव ट्रॅव्हल्सने आॅटोला दिलेल्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माळेगाव (टाऊन) येथे शनिवारी (दि. २९) रात्री ८.५० वाजताच्या सुमारास झाला. या अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रॅव्हल्स पेटविली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कमलाबाई मधुकर पालेकर (७५), उमेश विनायक दहीकर (२५) आणि आॅटोचालक गजानन पांडुरंग चांदूरकर (४०) सर्व रा. माळेगाव (टाऊन) अशी मृतांची नावे आहेत. जखमींमध्ये राजेंद्र मधुकर पालेकर (४०), अर्चना राजेंद्र पालेकर (३५), पारस राजेंद्र पालेकर (५) आणि सुनील चांदूरकर (२५) सर्व रा. माळेगाव (टाऊन) यांचा समावेश असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना सावनेरच्या शासकीय रुग्णालयातून मेडिकलमध्ये हलविण्यात आले आहे.एमएच-४०/१३९२ क्रमांकाच्या आॅटोने सर्वजण माळेगाव (टाऊन) येथे जात होते.सावनेरकडून माळेगावकडे आॅटोने वळण घेताच नागपूरकडून सावनेर दिशेने येणाºया एमपी-२८/सी-०३०१ क्रमांकाच्या भरधाव ट्रॅव्हल्सने आॅटोला जबर धडक दिली. त्यात घटनास्थळीच दोघांचा मृत्यू झाला तर इतर सर्व गंभीर जखमी झाले. त्यांना लगेच नागरिकांनी सावनेरच्या शासकीय रुग्णालयात भरती केले. तेथे गजानन चांदूरकरचा मृत्यू झाला. जखमी सर्वांवर प्रथमोपचार करून मेडिकलमध्ये हलविण्यास वैद्यकीय अधिकाºयांनी सांगितले. त्यानुसार सर्वांना नागपूरच्या मेडिकलमध्ये हलविण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.दरम्यान, अपघात होताच संतप्त ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघातास कारणीभूत ठरलेली ट्रॅव्हल्स पेटविली. पाहता - पाहता आगीने अख्खी ट्रॅव्हल्स भस्मसात झाली. यावेळी सावनेर पोलीस घटनास्थळी असून काहीच करू शकले नाही. जमावासमोर पोलिसांचे काहीएक चालले नाही. ट्रॅव्हल्स विझविण्यासाठी सावनेर नगर परिषदेचे अग्निशमन दल आले असता नागरिकांनी त्यांच्या दिशेने गोटमार करून अग्निशमन दलाचा विरोध करीत त्यांना परत पाठविले. या अपघातामुळे काही काळ घटनास्थळी तणाव निर्माण झाला. अपघात होताच ट्रॅव्हल्सचा चालक घटनास्थळाहून पसार झाला.