शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

भाग्यश्री वासनकरचा जामीन फेटाळला

By admin | Updated: September 22, 2015 04:17 IST

शिवाजीनगर येथे वासनकर वेल्थ मॅनेजमेंट या नावाने गोरखधंदा उघडून आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून ४७८

नागपूर : शिवाजीनगर येथे वासनकर वेल्थ मॅनेजमेंट या नावाने गोरखधंदा उघडून आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून ४७८ गुंतवणूकदारांची १६९ कोटी रुपयांनी लुबाडणूक केल्याप्रकरणी एमपीआयडी कायद्याचे विशेष न्यायाधीश व्ही.टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाने या प्रकरणातील सूत्रधारांपैकी एक भाग्यश्री प्रशांत वासनकर हिचा जामीन अर्ज सोमवारी फेटाळून लावला. २ कोटी ७५ लाख ३६ हजार रुपयांनी फसवणूक झाल्याने लक्ष्मीनगर येथील रहिवासी विवेक अशोक पाठक यांच्या तक्रारीवरून ९ मे २०१४ रोजी अंबाझरी पोलीस ठाण्यात प्रशांत वासनकरसह नऊ जणांविरुद्ध भादंविच्या ४२०, ४०६, ५०६, १२० (ब), ४०९ आणि एमपीआयडी कायद्याच्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले होते. वासनकर वेल्थ मॅनेजमेन्ट कंपनीने वार्षिक ४० ते १५० टक्के जादा व्याजाचे आमिष दाखवून मासिक, तिमाही, वार्षिक, द्विवार्षिक, १८ महिने, ३३ महिने, ४८ महिने, पर्क, लिक्विड अशा वेगवेगळ्या आकर्षक योजनांतर्गत गुंतवणूकदारांच्या २००८ पासून मोठमोठ्या रकमांच्या ठेवी स्वीकारल्या होत्या. या ठेवी ३० टक्के चेकद्वारे आणि ७० टक्के रोखीने होत्या. कंपनीने मुदत संपूनही ठेवी परत केल्या नव्हत्या आणि परतावा देखील दिलेला नव्हता.धंदा भरभराटीस आल्यानंतर भाग्यश्री हिने ठेवीदारांच्या गुंतवणुकीतून प्राप्त झालेला पैसा वासनकर वेल्थ मॅनेजमेंटच्या खात्यातून स्वत:च्या खात्यात वळवून ५ कोटी ५८ लाख रुपये किमतीचे शेअर्स मुंबई येथील नरेश चंदन आणि चेतना चंदन यांच्यामार्फत खरेदी केले. हे शेअर्स १ लाख २४ हजार ८८ एवढे असून ते सिक्कीम फेरो अलॉईड या कंपनीचे आहेत. गुंतवणूकदारांना सदस्य बनवण्यापोटी भाग्यश्रीने १८ कोटी रुपये प्राप्त केले होते. याशिवाय तिने कंपनीचे २५ कोटी रुपये स्वत:च्या खात्यात वळते केले होते. ती परिधी ट्रेडिंगची संचालक असताना परिधीच्या खात्यातील रोख आणि शेअर्सही तिने आपल्या वैयक्तिक खात्यात जमा केले होते. आपल्या खात्यातून तिने नरेश चंदन, अनिल सावरकर, विलास भोयर, सदोदय इन्व्हेस्टमेंट, रिना जैन, रत्नेश जैन, अविनाश भुते यांना मोठमोठ्या रकमा दिल्या आहेत.प्रशांत, विनय वासनकर आणि अभिजित चौधरी हे कारागृहात असताना भाग्यश्रीने कंपनीच्या वेल्थ व्यवस्थापक सारिका चंदेल हिला कारागृहात पाठवून तिच्यामार्फत सामंजस्य करार तयार करून घेतला होता. त्यानंतर भाग्यश्रीने या करारावर गुंतवणूकदारांच्या सह्या घेतल्या होत्या. भाग्यश्रीचा विशेष न्यायालयात आतापर्यंत दोन वेळा जामीन अर्ज फेटाळल्या गेला आहे. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील कल्पना पांडे तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. चंद्रशेखर जलतारे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)