शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर थुंकणाऱ्यांनो सावधान, नागपुरात एका दिवसात १९ जणांविरुद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 20:34 IST

रस्ते, फूटपाथ तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवून शहर विद्र्रुप करणाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी मनपातर्फे उपद्रव शोधपथक तैनात करण्यात आले आहे. बुधवारी पथकाद्वारे संविधान चौकात अस्वच्छता पसरविणाºया १९ उपद्रवींवर कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्दे३२०० रुपये दंडही वसूलखर्रा खाऊन पॉलिथीन फेकणेही महगात पडणारसंविधान चौकात मनपाच्या उपद्र्रव शोध पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्ते, फूटपाथ तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवून शहर विद्र्रुप करणाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी मनपातर्फे उपद्रव शोधपथक तैनात करण्यात आले आहे. बुधवारी पथकाद्वारे संविधान चौकात अस्वच्छता पसरविणाऱ्या १९ उपद्रवींवर कारवाई करण्यात आली.संविधान चौकामध्ये सिग्नलवर उभे राहून थुंकणे, कचरा टाकणे असे उपद्रव पसरविले जातात. ही बाब लक्षात येताच चौकातील चारही सिग्नलवर पथक तैनात करण्यात आले. यावेळी रस्त्यावर थुंकणे, खर्रा खाऊन पॉलिथिन रस्त्यातच टाकून अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर पथकाद्वारे कारवाई करण्यात आली. उपद्रव शोध पथकाद्वारे रस्त्यावर थुुंंकणाऱ्या १३ उपद्रवींवर कारवाई करीत त्यांच्याकडून २६०० रुपये दंड तर खर्रा खाऊन पॉलिथिन टाकणाऱ्या ६ उपद्र्रवींवर कारवाई करीत ६०० रुपये दंड असे एकूण १९ जणांकडून ३२०० रुपये वसूल करण्यात आले.शहर विद्रुप करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून नागरिकांना शिस्त लावण्यासाठी पथकाद्वारे दररोज शहरातील विविध भागात कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपले शहर स्वच्छ, सुंदर राहावे यासाठी जबाबदारी बाळगून कुठेही अस्वच्छता पसरवू नये, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या निर्देशानुसार स्वच्छ भारतचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ व मंगळवारी झोनच्या पथकाकडून संयुक्तरीत्या ही कारवाई करण्यात आली.

 

 

टॅग्स :Socialसामाजिक