शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
4
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
5
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
6
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
7
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
8
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
11
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
13
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
14
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
15
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
16
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
17
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
18
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
19
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
20
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

‘पॉन्झी’ योजनांपासून सावधगिरी बाळगा: मान्यवरांचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 23:26 IST

सामान्य नागरिकांचा छोट्या गुंतवणुकीकडे जास्त कल असतो. बाजारातील ‘पॉन्झी’ योजनांपासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन आ. गिरीश व्यास यांनी येथे केले.

ठळक मुद्देसीए संस्थेतर्फे ‘निवेश पाठशाला’वर चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामान्य नागरिकांचा छोट्या गुंतवणुकीकडे जास्त कल असतो. कमी वेळात जास्त परतावा मिळविण्यावर भर असतो. या कारणामुळे ते खोट्या आर्थिक योजनांच्या जाळ्यात अडकतात. त्यांना दुप्पट रक्कम कधीच मिळत नाही. अखेर ते नशीबाला दोष देतात. त्यामुळे गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीपूर्वी आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि बाजारातील ‘पॉन्झी’ योजनांपासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन आ. गिरीश व्यास यांनी येथे केले.आयसीएआयच्या नागपूर सीए शाखेतर्फे भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयातर्फे गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण फंड (आयईपीएफ)अंतर्गत इक्विटी गुंतवणूकदारांसाठी ‘निवेश पाठशाला’ या शीर्षकाखाली चर्चासत्राचे आयोजन धंतोली येथील सभागृहात करण्यात आले. यावेळी नागपूर संस्थेचे अध्यक्ष सीए सुरेन दुरगकर, सीए डॉ. टी.एस. रावल, सीए जुल्फेश शाह, हरीश शनवारे, कोषाध्यक्ष सीए जितेन सागलानी, सचिव सीए साकेत बागडिया, सीए महेश अग्रवाल, सदस्य सीए हरीश रुगवानी उपस्थित होते.व्यास म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था वेगवेगळ्या मायक्रो-इकॉनोमिक डेटाद्वारे दर्शविल्या जाणाऱ्या आर्थिक स्थिरतेद्वारे मोजली जाते. सरकारी योजना आणि अंतिम लाभार्थी यांच्यातील मध्यस्थता दूर करून ‘सबका साथ सबका विश्वास’हा पंतप्रधानांचा दृष्टिकोन विश्वास व सेवा वचनबद्धतेचे वातावरण तयार करण्यासाठी आहे. पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगण्यासाठी राज्य शासन आणि केंद्राच्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.रावल यांनी मूलभूत विश्लेषणाच्या महत्त्वाच्या बाबींबद्दल व इक्विटींमध्ये गुंतवणूक करण्यावर मार्गदर्शन केले. त्यांनी गुंतवणूकदार आणि फंड मॅनेजरच्या गुंतवणुकीची शैली सांगितली. हरीश शनवारे यांनी इक्विटीमध्ये व्यापार करताना चार्ट व तांत्रिक विश्लेषणाचे महत्त्व विशद केले. त्यांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून गुंतवणुकीची माहिती दिली. ते म्हणाले, इक्विटीमध्ये व्यवहार करताना नेहमीच ट्रेंडबरोबर राहा. ट्रेंड हा तुमचा चांगला मित्र आहे.प्रारंभी सुरेन दुरगकर यांनी पाहुणे व वक्त्यांचे स्वागत केले आणि आर्थिक साधनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी जनजागृतीचे महत्त्व सांगितले. इक्विटी गुंतवणुकीच्या क्षेत्रातील तज्ज्ञ वक्त्यांच्या विचारविनिमयातून गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. गुंतवणूक करताना सीएंचा सल्ला घेण्याचे आवाहन केले. यावेळी १५० पेक्षा जास्त गुंतवणूकदार उपस्थित होते.

 

टॅग्स :Investmentगुंतवणूकchartered accountantसीए