शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
4
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
5
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
6
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
7
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
8
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
9
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
10
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
11
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
12
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
13
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
14
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
15
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
16
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
17
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
18
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
19
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
20
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?

देशविरोधी, विघातक शक्तीपासून सावध रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 21:30 IST

Nagpur News Dattatray Hosbale कोरोना महामारीने देशात थैमान घातले. या परिस्थितीचा फायदा घेऊन देश विरोधी आणि समाजविघातक शक्ती नकारात्मकता आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण करू शकतात. अशा शक्तीपासून सावध राहून धैर्य, मनोबल उंच ठेवत परस्पर सहकार्य आणि संयमाने संकटाचा सामना करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्क  

नागपूर : कोरोना महामारीने देशात थैमान घातले. या परिस्थितीचा फायदा घेऊन देश विरोधी आणि समाजविघातक शक्ती नकारात्मकता आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण करू शकतात. त्यामुळे अशा शक्तीपासून सावध राहून धैर्य, मनोबल उंच ठेवत परस्पर सहकार्य आणि संयमाने संकटाचा सामना करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी केले.

यासंदर्भात शनिवारी सरकार्यवाह म्हणाले की, कोरोना साथरोगाचा विळखा देशाला पडला आहे. परिस्थिती विक्राळ रूप धारण करतेय. या वातावरणात नागरिकांनी आशा, विश्वास आणि सकारात्मक वातावरण कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. कोरोना साथरोगाच्या संकटात सापडलेल्या कुटुंबांबद्दल सरकार्यवाह यांनी संवेदना व्यक्त केल्या. तसेच समाजाने एकमेकांच्या सहकार्यासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सर्व सामाजिक व धार्मिक संघटना, संस्था आणि उद्योजकांना त्यांनी या संकटकाळात यथासंभव योगदान देण्याची साद घातली आहे.

अनेक कुटुंबांनी काेराेनामुळे आपले प्रियजन गमावले आहेत. त्यांचे दुःख, वेदना शब्दात मांडणे कठीण आहे. परिस्थिती बिकट असली तरी समाज म्हणून संघर्षाची आमची शक्ती कायम ठेवली पाहिजे. परस्पर सहकार्य, स्नेह, संयम आणि अनुशासनाचे पालन करून आम्ही या संकटावर नक्की मात करू, असा विश्वास होसबळे यांनी व्यक्त केला. या संकटकाळात नेहमीप्रमाणेच संघाचे स्वयंसेवक विविध प्रकारच्या सेवाकार्यात सक्रिय योगदान देत आहेत. त्यासोबतच धार्मिक आणि सामाजिक संस्था आणि सर्वसामान्य लोकदेखील त्यांच्या शक्तीनुसार योगदान देताना दिसून येतात. सेवाकार्यात सक्रिय असणाऱ्यांनी सुरक्षित अंतर राखणे, मास्क लावणे, स्वच्छता अशा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यासोबत शासनाने आखून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन गरजेचे आहे. समाजातील प्रत्येक घटकाने शासन-प्रशासन, आरोग्य कर्माचारी, स्वच्छता कर्मचारी यांना संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन होसबळे यांनी केले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ