शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

‘बेस्ट लक’ नोटा ठरल्या बिनकामाच्या

By admin | Updated: November 17, 2016 03:12 IST

अमिताभ बच्चनच्या कोण्या एका चित्रपटात ७८६ या क्रमांकाचे महत्त्व अधोरेखित करणारे दृश्य दाखविले होते

७८६ क्रमांकाच्या नोटा संग्रहकर्त्यांचा हिरमोड : खिन्न मनाने नोटा बदलण्याची वेळनागपूर : अमिताभ बच्चनच्या कोण्या एका चित्रपटात ७८६ या क्रमांकाचे महत्त्व अधोरेखित करणारे दृश्य दाखविले होते आणि एका रात्रीत हा क्रमांक लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय झाला. नशिबाची जोड लाभते म्हणून या क्रमांकाशी संबंधित वस्तू संग्रहित करण्याचे काम लोकांनी केले. मग या क्रमांकाच्या चलनी नोटाही लोकांच्या संग्रहाचा भाग झाल्या. परंतु १०००, ५०० च्या नोटा बदलण्याच्या निर्णयाने एका रात्रीत ‘बेस्ट लक’चे प्रतीक असलेल्या या नोटा बिनकामाच्या झाल्या आणि अनेक वर्षांपासून या नोटा संग्रह करणाऱ्यांचा चांगलाच हिरमोड झाला.७८६ या क्रमांकाचा संबंध पावित्र्याशी आणि नशिबाशी जोडला जातो. त्यामुळे मुस्लिमच नाही तर प्रत्येक धर्मीयांमध्ये या क्रमांकाविषयी विशेष आस्था बाळगली जाते. हा क्रमांक बेस्ट लक ठरतो म्हणून अनेकांना या क्रमांकाच्या चलनी नोटा जमा करण्याचा छंदही जोपासला आहे. पंजाबी लाईन, रेल्वे क्वॉर्टर या वस्तीत राहणारे गोपाल राव हे त्यातीलच एक छंदिस्ट. तसा त्यांना लहानपणापासूनच महापुरुषांचे छायाचित्र असलेले शिक्के व विशेष क्रमांकाच्या नोटा गोळा करण्याचा छंद आहे. हा ठेवा त्यांच्या संग्रही आहे. मात्र ७८६ क्रमांकाच्या नोटांवर त्यांची विशेष आस्था. या क्रमांकाच्या १ रुपयापासून १००० पर्यंतच्या जवळपास ४० हजार रुपयांच्या नोटा त्यांच्याजवळ आहेत. त्यातही ५०० च्या ४७ आणि १००० च्या ८ अशा ३१ हजार रुपयांच्या नोटा त्यांच्याजवळ आहेत. अगदी अटीतटीच्या वेळीही गोपाल यांनी या नोटांना हात लावला नाही व इतर उपाय करून आपली गरज भागविली होती. मात्र सरकारच्या नोटा बदलण्याच्या निर्णयाने अनेक वर्षांपासून त्यांच्याजवळ ‘बेस्ट लक’ म्हणून असलेल्या नोटा एका रात्रीत ‘बॅड लक’ ठरल्या आहेत. आस्था आपल्या जागी असली तरी अर्थशास्त्र महत्त्वाचे हा व्यवहार त्यांना माहीत आहे. मात्र एवढ्या वर्षांत एकेक करीत गोळा केलेले हे धन आता कुठल्याही कामाचे राहिले नाही, या विचाराने त्यांचे अंत:करण जड झाले आहे. एवढ्या वर्षांत जोपासलेला हा ठेवा नाईलाजाने बदलावाच लागेल, हा विचार गोपाल राव यांना उदास करीत आहे. (प्रतिनिधी) फॅन्सी नंबर नोटा संग्रहकर्त्यांचा हिरमोडइतक्या वर्षात एक एक करून या नोटा गोळा केल्या आहेत. या नोटांसोबत मन जुळले आहे. अगदी कठीण प्रसंगीही त्या नोटा खर्च केल्या नाहीत. मात्र नोटबंदीच्या निर्णयाने या नोटांना किंमतच उरली नाही. नाईलाजाने या नोटा बदलाव्या लागणारच आहेत. मात्र या नोटा बँकेत जमा करताना अतीव दु:ख होत आहे. एवढे वर्ष संग्रह केल्याने आजही बदलण्याची इच्छा होत नाही. - गोपाल राव, संग्रहकर्ता