शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पणजोबाच्या जात वैधता प्रमाणपत्राचा पणतीला फायदा : हायकोर्टाचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 22:31 IST

जात सिद्ध करण्यासाठी जुनी कागदपत्रे अत्यंत उपयोगी ठरतात. एका प्रकरणात पणतीला तिच्या पणजोबाने काढून ठेवलेल्या जात वैधता प्रमाणपत्राचा फायदा झाला. त्या आधारावर पणतीला समान जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी पात्र ठरविण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पणतीला दिलासा मिळाला.

ठळक मुद्देपणतीलाही समान प्रमाणपत्र देण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जात सिद्ध करण्यासाठी जुनी कागदपत्रे अत्यंत उपयोगी ठरतात. एका प्रकरणात पणतीला तिच्या पणजोबाने काढून ठेवलेल्या जात वैधता प्रमाणपत्राचा फायदा झाला. त्या आधारावर पणतीला समान जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी पात्र ठरविण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पणतीला दिलासा मिळाला.पायल गराटे असे पणतीचे नाव असून ती नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम. बी. बी. एस. अभ्यासक्रमाला शिकत आहे. तिचे पणजोबा हिरामण गराटे यांना त्यांच्या अर्जावरून माना-अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र जारी करण्यात आले होते. त्या आधारावर माना-अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी पायलने अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दावा दाखल केला होता. परंतु, समितीने तिचा दावा खारीज केला. पणजोबाला कारणे नमूद न करता वैधता प्रमाणपत्र देण्यात आले असे मत समितीने निर्णयात नोंदवले. त्याविरुद्ध पायलने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती.उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व पुष्पा गणेडीवाला यांनी प्रकरणातील विविध बाबी तपासल्यानंतर पायलची याचिका मंजूर केली व तिला चार आठवड्यात माना-अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र जारी करण्यात यावे असा आदेश समितीला दिला. समितीने कायदेशीर तरतुदी लक्षात घेताना चूक करून पायलचा दावा खारीज केला. तिच्या पणजोबाने वैधता प्रमाणपत्र अवैधपणे मिळविल्याचे काहीच पुरावे नाही. उलट ते प्रमाणपत्र जारी करण्याचा निर्णय अंतिम झाला आहे. तसेच, पायल व तिच्या पणजोबाच्या नात्याबाबतही काहीच वाद नाही असा निष्कर्ष उच्च न्यायालयाच्या निर्णयात नमूद करण्यात आला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCaste certificateजात प्रमाणपत्र