शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीने केला प्रियकरावर बलात्काराचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या विवाहबाह्य संबंधात कटुता आल्यामुळे प्रेयसीने तिच्या प्रियकरावर ब्लॅकमेलिंग आणि बलात्काराचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या विवाहबाह्य संबंधात कटुता आल्यामुळे प्रेयसीने तिच्या प्रियकरावर ब्लॅकमेलिंग आणि बलात्काराचा आरोप केला. त्यामुळे त्याला बजाजनगर पोलिसांनी अटक केली. अमरदीप कृष्णाजी मंडपे (वय ४०) असे आरोपीचे नाव आहे. तो आणि त्याच्यावर बलात्काराचा आरोप करणारी ३७ वर्षीय महिला हे दोघे शंकरनगर चौकाजवळच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करतात. गेल्या वर्षी त्यांचे सूत जुळले. या दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अनेकदा शरीरसंबंध प्रस्थापित केले. अलीकडे त्यांच्यात कटुता निर्माण झाल्याने खटके उडू लागले. या पार्श्वभूमीवर मंडपे विरुद्ध त्याच्या प्रेयसीने रविवारी बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. शरीरसंबंधाचा अश्लील व्हिडिओ तयार करून तो इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी देऊन मंडपेने बलात्कार केल्याची तक्रार या महिलेने पोलिसांकडे दिली. तिच्या आरोपावरून गुन्हा दाखल करून रविवारी रात्री मंडपेला पोलिसांनी अटक केली.

---

हॉस्पिटल प्रशासनात खळबळ

या घडामोडींमुळे हॉस्पिटल प्रशासनातही खळबळ उडाली आहे. या दोघांच्या प्रेम प्रकरणाची माहिती त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अनेकांना होती. काहींनी त्यांना समजही दिली होती. आता प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचल्याने हॉस्पिटल प्रशासन अस्वस्थ झाले आहे. त्यामुळे पोलिसांकडून कारवाई झाल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाकडूनही या दोघांवर कारवाई होणार असल्याची संबंधित वर्तुळात चर्चा आहे.

---