शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विश्वासातील व्यक्तीने केला विश्वासघात

By admin | Updated: June 24, 2017 02:42 IST

विश्वासातील व्यक्तीने कटकारस्थान रचून बनावट कागदपत्राद्वारे एका व्यक्तीचे घर बँकेत गहाण ठेवले.

कटकारस्थान रचले : गहाणपत्राऐवजी बनविले घराचे विक्रीपत्र लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विश्वासातील व्यक्तीने कटकारस्थान रचून बनावट कागदपत्राद्वारे एका व्यक्तीचे घर बँकेत गहाण ठेवले. हा गैरप्रकार उघड होऊनही पोलिसांनी या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला. मात्र, वरिष्ठांकडे हा गैरप्रकार गेल्यानंतर सक्करदरा पोलिसांनी आरोपी गौरव ऊर्फ सूरज अरविंद ठाकरे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. गौरव ऊर्फ सूरज अरविंद ठाकरे (वय ४०, रा. श्रध्दा अपार्टमेंट मनीषनगर), विष्णू राधेलाल शर्मा (वय ५०) आणि अनिता विष्णू शर्मा (वय ४५, रा. बंगला क्र. ४४, कामठी रोड, नागपूर) अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. आरोपी ठाकरे आणि विठ्ठलराव गोमासे यांचे घरोब्याचे संबंध होते. पैशाची चणचण असल्यामुळे गोमासे यांनी ठाकरेच्या माध्यमातून कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न केले. आरोपी ठाकरेने आपल्या साथीदारांच्या साहाय्याने मदतीचा भास निर्माण केला. गृहकर्जासाठी गोमासे यांचे श्रीनाथ साईनगर ओंकारनगरातील घराचे गहाणपत्राऐवजी विक्रीपत्र तयार केले. ते नागपूर सहकारी बँकेत जमा केले. या विक्रीपत्राची बनावट प्रत तयार करून आयसीआयसी बँकेतून कर्ज घेण्यासाठी त्याचा गैरवापर केला. एवढेच नव्हे तर चेक वटविण्यासाठी दुसऱ्या एका बँकेत खाते उघडून तेथेही गोमासेंच्या नावे बनावट कागदपत्रांचा वापर केला. त्याआधारे तीन टप्प्यात धनादेशाच्या माध्यमातून १३ लाख १३ हजार ५७६ रुपये काढून घेतले. २९ नोव्हेंबर २००६ ते ६ डिसेंबर २००६ दरम्यान ही बनवाबनवी झाली. पोलिसांकडूनही मनस्ताप विठ्ठलराव यांचा मुलगा श्याम गोमासे यांनी या प्रकरणात तक्रार नोंदवण्यासाठी सक्करदरा पोलिसांकडे अनेकदा येरझारा घातल्या. मात्र, आरोपींनी पोलिसांशी संधान साधून पीडित परिवारालाच वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. शेवटी दोन दिवसांपूर्वी हे प्रकरण पोलीस उपायुक्त एस. चैतन्य यांच्याकडे गेले. त्यांनी सक्करदरा पोलिसांना जाब विचारल्यानंतर गुरुवारी रात्री या प्रकरणात पोलिसांनी ठाकरे आणि शर्मा दाम्पत्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.