शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

गुंगारा देणाऱ्या भोंदूला १० वर्षे कारावास

By admin | Updated: January 25, 2017 02:48 IST

रेल्वे प्रवासातील ओळखीचा गैरफायदा घेत घरी पाहुणा म्हणून येऊन संपूर्ण कुटुंबाला प्रसादातून गुंगीचे औषध देऊन

रेल्वे प्रवासातील ओळखीने ओढवले होते संकट नागपूर : रेल्वे प्रवासातील ओळखीचा गैरफायदा घेत घरी पाहुणा म्हणून येऊन संपूर्ण कुटुंबाला प्रसादातून गुंगीचे औषध देऊन लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या एका भोंदूला अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. सी. राऊत यांच्या न्यायालयाने मंगळवारी १० वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दीपक कन्हैयालाल सरवय्या ऊर्फ डॉ. दीपक शाहू (६२), असे आरोपीचे नाव असून तो यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस तालुक्यातील नवीन चिचोली येथील रहिवासी आहे. प्रकरण असे, सिव्हिल लाईन्स रिझर्व्ह बँक क्वॉर्टर येथील रहिवासी दिनेश नृपती शाहू हे आपल्या कुटुंबासह १३ सप्टेंबर २०१४ रोजी जबलपूर एक्स्प्रेसने अमरावतीहून नागपूरला परतत असताना त्यांची शेजारच्या बर्थवर बसलेल्या या भोंदूसोबत ओळख झाली होती. त्याने स्वत:चे नाव दीपक शाहू असल्याचे आणि आयुर्वेद डॉक्टर असल्याचे तसेच नागपुरात अधूनमधून येणे होत असल्याचे सांगितले होते. आपण एकाच समाजाचे आहोत, असेही त्याने सांगितले होते. त्याला दिनेश शाहू यांनी नागपुरात येणे झाल्यास घरी येण्याचे निमंत्रणच देऊन टाकले होते. २१ सप्टेंबर २०१४ रोजी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास हा भोंदू रिझर्व्ह बँक क्वॉर्टर येथील दिनेश शाहू यांच्या घरी पाहुणा म्हणून गेला होता. त्यावेळी ते रात्रपाळी ड्युटीसाठी गेले होते. दिनेशची पत्नी निशा हिने आपल्या पतीला मोबाईलवर या पाहुण्याबाबत सांगितले असता त्यांनी या पाहुण्याला जेवण देण्यास सांगितले होते. जेवणापूर्वी या भोंदूने निशा, दोन मुले आणि भाच्याला बुंदीच्या लाडूचा प्रसाद खाण्यास दिला होता. त्यानंतर सर्वांनी जेवण केले होते. हळूहळू गुंगी येऊन निशा आणि लहान मुले बेशुद्ध झाले होते. गैरफायदा घेत भोंदूने घरातील ३ लाख ३८ हजार ५०० रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी निशा शाहू शुद्धीवर आली असता तिला तिचे संपूर्ण घर साफ झालेले दिसले होते. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून भोंदूला अमरावती भागात अटक करण्यात आली होती. सहायक पोलीस निरीक्षक आर. जे. बांदेकर यांनी तपास करून आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सात साक्षीदार तपासण्यात आले. (प्रतिनिधी) दोन्ही गुन्ह्यात सुनावली शिक्षा न्यायालयाने गुन्हा सिद्ध होऊन या भोंदूला भादंविच्या ३२८ कलमांतर्गत १० वर्षे सश्रम कारावास, ५०० रुपये दंड आणि ३८० कलमांतर्गत ७ वर्षे कारावास, ५०० रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. आरोपीला या दोन्ही शिक्षा एकत्र भोगाव्या लागतील. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील वर्षा आगलावे, नितीन देशमुख तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. निशा गजभिये यांनी काम पाहिले. नायक पोलीस रवींद्र धरपाल, हेड कॉन्स्टेबल रविकिरण भास्करवार यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.