शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅप’मुळे डॉक्टरांची मुंबईवारी थांबणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 22:48 IST

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी) डॉक्टरांच्या नूतनीकरणासाठी ‘मोबाईल अ‍ॅप’ सुरू केले आहे. खासगी सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी याचे स्वागत केले आहे. या ‘अ‍ॅप’मुळे नूतनीकरणासाठी मुंबईची वारी थांबणार असून ‘एमएमसी’ची किचकट कागदोपत्री प्रक्रियाही सुलभ होणार आहे. अशाप्रकारचे ‘मोबाईल अ‍ॅप’ सुरू करणारी ‘एमएमसी’ ही देशातील पहिली संस्था ठरली आहे.

ठळक मुद्देनोंदणी नूतनीकरण झाले सोपे : एमएमसीने सुरू केले मोबाईल अ‍ॅप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी) डॉक्टरांच्या नूतनीकरणासाठी ‘मोबाईल अ‍ॅप’ सुरू केले आहे. खासगी सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी याचे स्वागत केले आहे. या ‘अ‍ॅप’मुळे नूतनीकरणासाठी मुंबईची वारी थांबणार असून ‘एमएमसी’ची किचकट कागदोपत्री प्रक्रियाही सुलभ होणार आहे. अशाप्रकारचे ‘मोबाईल अ‍ॅप’ सुरू करणारी ‘एमएमसी’ ही देशातील पहिली संस्था ठरली आहे.सुमारे एक लाख ४० हजार डॉक्टरांना नोंदणी नूतनीकरणासाठी मुंबई येथील ‘एमएमसी’च्या कार्यालयात दर पाच वर्षांनी जावे लागत होते; शिवाय विविध वैद्यकीय परवानगी घेण्यासाठी स्वत: हजर राहावे लागायचे. याची दखल एमएमसीचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी घेतली. त्यांच्या पुढाकारातून मोबाईल अ‍ॅप सुरू करण्यात आले. या अ‍ॅपमुळे देशाच्या कानाकोपऱ्यात कुठूनही कायमस्वरूपी नोंदणीकरिता वैद्यकीय व्यावसायिकांना अर्ज सादर करणे तसेच आॅनलाईन शुल्क भरणे इत्यादी कामे आता घरबसल्या करता येतील; शिवाय डॉक्टरांना वैद्यकीय परवान्याचे नूतनीकरण आॅनलाईन करता येणार आहे सोबतच सामान्य रुग्णास आपल्या डॉक्टरांची संपूर्ण माहिती एका क्लिकद्वारे उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाला निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यशाळांना (सीएमई) उपस्थित राहिल्याबद्दल किती ‘क्रेडिट पॉर्इंट’ खात्यात जमा झाले, याचीही माहिती या अ‍ॅपद्वारे मिळू शकणार आहे. ‘एमएमसी’च्या वेबसाईटवरील माहितीही या अ‍ॅपमध्ये दिसणार आहे.

 

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर