शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मेयोतील एमबीबीएसच्या जागा कमी केल्यास कारवाईला तयार राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:01 IST

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या ५० जागा कमी केल्यास अवमानना कारवाईसाठी तयार राहा. दोषी अधिकाऱ्यांसाठी तिहार किंवा वर्धा रोडवरील कारागृहात जागा रिकामी ठेवली जाईल, अशी मौखिक तंबी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया(एमसीआय)ला दिली.

ठळक मुद्देहायकोर्टाची तंबी : एमसीआय सोमवारी देणार स्पष्टीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या ५० जागा कमी केल्यास अवमानना कारवाईसाठी तयार राहा. दोषी अधिकाऱ्यांसाठी तिहार किंवा वर्धा रोडवरील कारागृहात जागा रिकामी ठेवली जाईल, अशी मौखिक तंबी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया(एमसीआय)ला दिली.संबंधित प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. मेयोतील एमबीबीएस अभ्यासक्रमात १५० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची मान्यता आहे; पण आवश्यक सुविधा नसल्यामुळे ही संख्या १०० करण्यात यावी, अशी शिफारस ‘एमसीआय’ने गेल्या २८ फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारला केली आहे. प्रकरणातील न्यायालय मित्र अ‍ॅड. अनुप गिल्डा यांनी यासंदर्भात न्यायालयात नोट सादर करून ‘एमसीआय’ची ही शिफारस न्यायालयाचा अवमान करणारी आहे, असा दावा केला आहे. २०१४ मध्ये राज्य सरकारने मेयोमधील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागा कमी होऊ नये, यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे हमीपत्र न्यायालयात सादर केले होते. त्यानुसार मेयोमध्ये विविध प्रकारची विकास कामे केली जात आहेत. पहिल्या टप्प्यातील काही कामे पूर्ण झाली आहेत. न्यायालयाने ४ फेब्रुवारी २०१५ रोजी मेयोला एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या १५० जागा मंजूर करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे ‘एमसीआय’ने जागा कमी करण्याची शिफारस करणे चुकीचे आहे, असे अ‍ॅड. गिल्डा यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता, ‘एमसीआय’ला यावर स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला होता. ‘एमसीआय’ने बुधवारी याकरिता वेळ देण्याची विनंती न्यायालयाला केली. त्यानंतर न्यायालयाने वरीलप्रमाणे तंबी देऊन ‘एमसीआय’ची विनंती मान्य केली व प्रकरणावर २ एप्रिल रोजी पुढील सुनावणी निश्चित केली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयdoctorडॉक्टर