शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

मागणारे होण्यापेक्षा देणारे व्हा

By admin | Updated: October 26, 2016 03:01 IST

नागपूर महापालिकेने मंजूर केलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक मागील २५ वर्षांपासून रखडलेले आहे.

वीरसिंह यांचे आवाहन : बसपा संघटन आढावा सभा नागपूर : नागपूर महापालिकेने मंजूर केलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक मागील २५ वर्षांपासून रखडलेले आहे. त्याचे कामही सुरू होऊ शकलेले नाही. यासाठी कॉँग्रेस आणि भाजपा हे दोन्ही पक्ष जबाबदार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा एकमेव पक्ष हा बसपा असून बसपाला साथ द्या. मागणारे होण्यापेक्षा देणारे बना, बसपाचा महापौर बनवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मशताब्दी स्मारक स्वत: तयार करून घ्या, असे आवाहन बसपाचे राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्राचे प्रभारी खा. वीरसिंह यांनी येथे केले. बहुजन समाज पार्टीतर्फे विदर्भ हिंदी साहित्य संघ सीताबर्डी येथे आयोजित बसपा संघटन आढावा सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष विलास गरुड, उपाध्यक्ष कृष्णा बेले, प्रभारी प्रेम रोडेकर, जितेंद्र म्हैसकर, प्रदेश सचिव सागर डबरासे, उत्तम शेवडे, विश्वास राऊत, डॉ. राजेंद्र पडोळे, विवेक हाडके, पृथ्वीराज शेंडे, जिल्हाध्यक्ष नागोराव जयकर, मनपा गटनेते गौतम पाटील, रूपेश बागेश्वर, मिलिंद बन्सोड, संजय जैस्वाल, महेश सहारे, कविता लांडगे प्रामुख्याने उपस्थित होते. उत्तर प्रदेशात बसपाची सत्ता आली तेव्हा देशातील अनेक महापुरुषांची स्मारके तयार करण्यात आली. याची आठवण करून देत नागपूर महापालिकेतही बसपाची सत्ता आणा तेव्हा तुम्हाला कुणाला मागण्याची गरज पडणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेस आणि भाजपा हे दोन्ही पक्ष सारखेच असून ते भांडवलदार व उद्योगपतींचे हित जोपासणारे पक्ष आहेत, त्यांच्याकडून गरीब दीन, दलित शोषितांना न्याय मिळू शकत नाही, त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे सोडून द्या, असेही ते म्हणाले.यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी बसपात प्रवेश केला. (प्रतिनिधी)अ‍ॅट्रॉसिटी कायदा आणखी कडक व्हावाबसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यावेळी म्हणाले अ‍ॅट्रॉसिटी कायदा हा शिथिल न करता तो आणखी कडक करण्यात यावा. बसपा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही. परंतु इतर मागासवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. मनपा निवडणुका लक्षात घेता त्यांनी बसपा कार्यकर्त्यांना कामाला लागा असे निर्देश देत महापौर बनाओ अभियान चालवण्याचे आदेश दिले.