शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

कागदी नियोजनापेक्षा प्रत्यक्ष सज्ज राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:07 IST

नागपूर : आपत्ती व्यवस्थापनाच्या काळात कागदावरील नियोजनापेक्षा प्रत्यक्ष साधनसामुग्रीची सुसज्जता, बोटी, रोप, लाईफ जॅकेट आदी साहित्य अद्ययावत असणे ...

नागपूर : आपत्ती व्यवस्थापनाच्या काळात कागदावरील नियोजनापेक्षा प्रत्यक्ष साधनसामुग्रीची सुसज्जता, बोटी, रोप, लाईफ जॅकेट आदी साहित्य अद्ययावत असणे गरजेचे आहे. तालुका किंवा गावपातळीवर कोणतीही दुर्दैवी घटना घडल्यास सर्वांत आधी ती जिल्हा प्रशासनाला कळवावी. जिल्ह्यातील सर्व आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या दूरध्वनीची खात्री सर्व अधिकाऱ्यांनी करावी, स्वत: दूरध्वनी करावेत. जबाबदारी निश्चित करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विमला आर. यांनी शुक्रवारी दिले. छत्रपती सभागृहात मान्सूनपूर्व तयारीच्या आढाव्याच्या अनुषंगाने आयोजित ऑनलाईन बैठकीत त्या बोलत होत्या.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अकुंश गावंडे, पेंच पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रवीण झोड, दक्षिण नागपूर पाटबंधारेचे अभियंता राजेश दमणे, गोसीखुर्द धरण वाही (पवनी) चे अभियंता राजेश शर्मा उपस्थित होते.

हवामान संबंधित वेळोवेळी हवामान खात्याने दिलेले अलर्ट नागरिकांना देण्यात यावे. पूरप्रवण गावातील नागरिकांचे स्थलांतरण करण्यात येणाऱ्या निवारागृहात स्वच्छता असावी. पूरपरिस्थिती असलेल्या गावात संसर्गजन्य आजाराचा फैलाव होण्याची शक्यता असते, ते पाहता आरोग्य अधिकाऱ्यांनी नियोजन करावे.

लहान मुले, अपंग व वृद्धांचे स्थलांतरण करताना योग्य ती काळजी घ्यावी. आपत्तीकाळात एनडीआरएफ व एसडीआरएफच्या लोकांशी संपर्क करावा. तसेच त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

बॉक्स

- संवाद, संपर्क, सतर्कता या तीनही पातळीवर समन्वयाने काम करा

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या पूरपरिस्थितीने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. त्यामुळे यावर्षी अशी परिस्थिती उद्भवू नये, या अनुंषगाने जलसंपदा, कृषी, महावितरण, सर्व उपविभागीय अधिकारी, यांनी सतर्क राहण्यासोबतच समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. धरणातून करण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबाबत सिंचन विभागांनी तत्परतेने संबंधित यंत्रणेला माहिती द्यावी. संवाद, संपर्क, सतर्कता या तीनही पातळीवर समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.