शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सावधान... । तुमच्या नावाने सेक्स रॅकेट तर चालविले जात नाही ना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:07 IST

नरेश डोंगरे। लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - तपास यंत्रणांसाठी डोकेदुखी अन् सर्वसामान्यांसाठी प्रचंड मनस्तापाचा विषय ठरलेल्या सायबर गुन्हेगारांनी आता ...

नरेश डोंगरे।

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - तपास यंत्रणांसाठी डोकेदुखी अन् सर्वसामान्यांसाठी प्रचंड मनस्तापाचा विषय ठरलेल्या सायबर गुन्हेगारांनी आता एक नवीनच शक्कल शोधली आहे. एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालविणाऱ्या या गुन्हेगारांनी विविध शहरातील प्रतिष्ठितांचा फेसबुक आयडी हॅक करणे सुरू केले आहे. कुणाच्याही नावाचा डमी फेसबुक आयडी तयार करून त्यावर ते देखण्या तरुणींचे हॉट फोटो अपलोड करतात.

अवघ्या महिनाभरात नागपुरात अशी तीन उदाहरणे उघड झाली आहेत. त्याची माहिती कर्णोपकर्णी सर्वत्र पसरल्याने अनेकांनी त्याचा चांगलाच धसका घेतला आहे.

यापूर्वी सायबर गुन्हेगारांनी लॉटरी लागल्याची, डेबिट-क्रेडिट कार्ड ब्लॉक झाल्याची, केवायसी अपडेट करण्याची, कर्ज, नोकरी देण्याची थाप मारून अनेकांना गंडा घातला आहे. काही महिन्यांपासून सायबर गुन्हेगारांनी ‘सेक्स टॉर्शन’ हा प्रकार सुरू करून व्हिडिओ कॉल करीत ऑनलाइन सेक्सची ऑफर देत अनेकांचे कपडे उतरविले आहेत. तो व्हिडिओ नंतर संबंधित व्यक्तीला पाठवून त्याच्याकडून बदनामीचा धाक दाखवीत लाखोंची रक्कम उकळली आहे. आता ‘सोशल मीडिया हॅकिंग आणि सेक्स टॉर्शन’च्या साखळीतील नवीन गुन्हा उजेडात आला आहे. तुम्ही कोणत्याही गावात, शहरात राहा. त्याच्याशी सायबर गुन्हेगारांना देणे-घेणे नाही. ते तुमचा बेमालूमपणे वापर करून तुम्हाला नाहक मनस्ताप देतात.

---

((१))

सेक्स जॉब के लिये संपर्क करे

तुम्ही एखाद्या विशिष्ट पदावर अथवा क्षेत्रात मोठे असाल, तुमची फेसबुकवरची फॅन फॉलोविंग ठिकठाक असेल तर तुमचा डमी फेसबुक आयडी हे गुन्हेगार तयार करतात. त्यावर तरुणींचे हॉट फोटो, तसेच संपर्क क्रमांक दिला जातो. ‘इंडियन एस्कॉर्ट सर्व्हिस अँड कॉल बॉय सेक्स जॉब के लिये संपर्क करे या व्हॉटस्ॲप करे’... असे म्हणून संपर्क क्रमांकही दिला जातो. त्यावर संपर्क केल्यास मधुर आवाजातील ललना तुम्हाला जाळ्यात ओढते आणि नंतर तुम्हाला बदनामीचा धाक दाखवून तुमची आर्थिक पिळवणूक करते.

---

((२))

बदनामीचा धाक, तक्रारीस नकार

अशा प्रकारचे अनेक गुन्हे सर्रास घडत असले तरी बदनामीच्या धाकाने त्याची तक्रार करणारांची संख्या नगण्यच आहे. सायबर पोलिसांकडेही अशी ओरड करीत अनेक जण येत असले तरी बदनामीच्या धाकाने तक्रार मात्र नोंदवीत नाहीत. सामाजिक जबाबदारीतून संबंधित पोलीस अधिकारी पीडिताचा डमी फेसबुक आयडी डिलिट करून पोलीस त्याचा मानसिक त्रास झटक्यात संपवितात अन् प्रकरण उघडही होत नाही.

---

((३))

हीच ‘ती’ प्रकरणे

डमी फेसबुक आयडीचा गैरवापर करून सेक्स रॅकेटच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकाराची उपराजधानीत महिनाभरात तीन प्रकरणे पुढे आली आहेत. त्यातील एक मिहानमधील अधिकारी आहे. दुसरी व्यक्ती सामाजिक क्षेत्रात वावरणारी आहे, तर तिसरा उपराजधानीतील सांस्कृतिक क्षेत्राशी जुळलेला आहे.

----