लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सावधान... घराबाहेर निघू नका, वाघिण फिरत आहे...। नागपूरपासून ४० किलोमीटर दूर कोंढाळीच्या आसपासच्या गावांमध्ये वनकर्मचाºयांद्वारे लाऊडस्पीकरवर अशाप्रकारच्या सूचना दिल्या जात आहेत. गेल्या काही दिवसापासून या परिसरातील नागरिकांमध्ये नरभक्षक वाघिणीच्या वास्तव्यामुळे प्रचंड दहशत पसरली असून वनविभागाने अलर्ट जारी केला आहे.ब्रह्मपुरी परिसरात दहशत निर्माण करणारी नरभक्षक वाघिण सोमवारी पहाटे कोंढाळी जवळच्या कलमुंडा गावात दिसली.मंगळवारी दुपारी पुन्हा ही वाघिण रिंगणाबोडीच्या झुडपात नाल्याजवळ आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वनविभागाने वाघिणीचे लोकेशन मिळालेल्या झुडपी जंगलाच्या ५० मीटरच्या आसपास रेस्क्यू पथक तैनात केले आहे. वाघिण आढळून आलेल्या लोकेशनजवळच्या कलमुंडा, रिंगणाबोडी, खापा, मलकापूर आदी गावांमध्ये वनविभागाच्या कर्मचाºयांद्वारे स्थानिक नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. नागरिकांना शेतात जाण्यासही मनाई करण्यात आली आहे.आपात्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बोर, अमरावती, नागपूर आदी वनपरिक्षेत्राच्या रेंज कार्यालयातील कर्मचारी तसेच एसआरपी व पोलिसांचे पथक झुडपी जंगलाकडे जाणाºया मार्गावर तैनात केले आहे. या कर्मचाºयांचा वावर आणि वाघिणीच्या दहशतीमुळे आसपासच्या गावांमध्ये संचारबंदीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.यादरम्यान हैदराबादहून आलेल्या नवाब नामक शार्प शूटरने बुधवारी दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान नरभक्षक वाघिणीला गोळी घालण्याचा प्रयत्न केला. मात्र वाघिण दिसून न आल्याने त्याला यश मिळाले नाही. दुसरीकडे दिल्लीहून आलेले ट्रँक्यूलायजर एक्सपर्ट वासिद जावेदही ट्रॅँक्यूलायजरद्वारे वाघिणीला बेशुद्ध करण्याच्या प्रयत्नात कोंढाळी येथे तैनात असल्याचे सांगण्यात येत आहे.शूटरमध्ये ताळमेळ नाहीसूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मनेका गांधी यांच्या सूचनेवरून वाघिणीला ट्रॅँक्यूलाईज करण्यासाठी वासीद जावेद यांना कोंढाळीला पाठविण्यात आले आहे. वासीद वाघिणीला बेशुद्ध करून जिवंत पकडण्याच्या प्रयत्नात आहेत. दुसरीकडे शूटर नवाब वाघिणीला गोळीने ठार मारण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात आहे. बुधवारी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान नवाब यांनी रिंगणाबोडी गावापासून १०० मीटर दूर असलेल्या नाल्यातून वाघिणीला बाहेर काढून गोळी घालण्यासाठी पोजिशन घेतली होती. काही लोकांनी आवाज करून वाघिणीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधार होईपर्यंत वाघिण बाहेर निघाली नाही.वन्यजीव प्रेमींची कोंढाळीला कूचवाघिणीची माहिती मिळताच वन्यजीव प्रेमीही बुधवारी कोंढाळीच्या रिंगणाबोडीकडे रवाना झाले. वाघिणीला ठार मारण्याचे षड्यंत्र रचल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वन्यजीव प्रेमींनी गोळी झाडण्याऐवजी वाघिणीला बेशुद्ध करून गोरेवाडा रेस्क्यू केंद्रात ठेवण्याची मागणी केली आहे. वनविभागाच्या अधिकाºयांनी मात्र याबाबत मौन पाळले आहे.
सावधान.. वाघिण फिरतेय घराबाहेर पडू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:41 IST
‘सावधान... घराबाहेर निघू नका, वाघिण फिरत आहे...। नागपूरपासून ४० किलोमीटर दूर कोंढाळीच्या आसपासच्या गावांमध्ये वनकर्मचाºयांद्वारे लाऊडस्पीकरवर अशाप्रकारच्या सूचना दिल्या जात आहेत.
सावधान.. वाघिण फिरतेय घराबाहेर पडू नका
ठळक मुद्देकोंढाळी परिसरातील गावांमध्ये दहशत