शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा शुल्काबाबत ‘बीसीसीआय’ने केली टाळाटाळ

By admin | Updated: January 20, 2017 02:33 IST

विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा येथील मैदानावर झालेल्या क्रिकेट सामन्यांदरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून

व्हीसीएची माहिती : पोलीस बंदोबस्ताचे बिल थकीत नागपूर : विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा येथील मैदानावर झालेल्या क्रिकेट सामन्यांदरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून आकारण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्था शुल्काबाबत ‘बीसीसीआय’ने टाळाटाळ केल्याची बाब समोर आली आहे. ‘व्हीसीए’तर्फेच (विदर्भ क्रिकेट असोसिएशन) यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिलेल्या शपथपत्रात हा खुलासा करण्यात आला आहे. वारंवार सांगण्यात आल्यानंतरदेखील ‘बीसीसीआय’ने उत्तर देण्यास टाळाटाळ केल्याचे ‘व्हीसीए’ने स्पष्ट केले.विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर २०१० ते २०१६ या काळात अनेक क्रिकेट सामने खेळले गेले. यादरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे आवश्यक पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आला होता. याचे कोट्यवधी रुपये संघटनेकडे थकीत आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते परमजितसिंग कलसी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. ‘व्हीसीए’कडे ७ कोटी ७८ लाख रुपये थकीत असल्याचा मुद्दा याचिकाकर्त्याने मांडला. यावर आक्षेप गेत ‘व्हीसीए’ने ४ कोटी ५० लाख रुपये सुरक्षा व्यवस्था शुल्क थकीत होते हे न्यायालयाला सांगितले. यापैकी ३ कोटी २० लाख रुपये संघटनेने महाराष्ट्र पोलीस कल्याण निधीमध्ये जमा केले आहेत. आता केवळ १ कोटी २५ लाख रुपये शिल्लक असल्याचे ‘व्हीसीए’तर्फे स्पष्ट करण्यात आले. उर्वरित रकमेपैकी ८९ लाख रुपये ग्रामीण पोलीस मागत असल्याचा मुद्दा ‘व्हीसीए’ने मांडला. यापैकी ३७ लाख रुपयांवर कुणालाही आक्षेप नसल्याचे लक्षात घेत ही रक्कम ‘व्हीसीए’ने एका आठवड्यात भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तसेच या रकमेबाबतचा वाद परस्पर सामंजस्याने मिटविता आल्यास बरे होईल, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. बीसीसीआयतर्फे वरिष्ठ अधिवक्ता एम.जी. भांगडे, व्हीसीएतर्फे अ‍ॅड. अक्षय सुदामे, याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड.हरनीश गढिया यांनी बाजू मांडली.