शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

छत्तीसगडच्या बुकींची नागपुरातून डावबाजी

By admin | Updated: January 8, 2017 02:12 IST

छत्तीसगडमधील कुख्यात बुकींनी नागपुरात येऊन क्रिकेटचे बेटिंग सुरू केले. काही पोलिसांशी हातमिळवणी करून सुरू झालेल्या

क्रिकेट सट्ट्याच्या पॉश अड्ड्यावर धाड नागपूर : छत्तीसगडमधील कुख्यात बुकींनी नागपुरात येऊन क्रिकेटचे बेटिंग सुरू केले. काही पोलिसांशी हातमिळवणी करून सुरू झालेल्या या क्रिकेट अड्ड्यावर सहायक पोलीस आयुक्त आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री धाड घातली आणि लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. तसेच आठ बुकींनाही जेरबंद केले. गिट्टीखदानमधील फ्रेण्डस् कॉलनीत क्रिकेट सट्ट्याचा अड्डा सुरू असून, येथे मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय बुकी बसले आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्तांना मिळाली. त्या आधारे एसीपी वाघचौरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास या पॉश अड्ड्यावर धाड घातली. यावेळी येथे आठ बुकी क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यावर खयवाडी करताना आढळले. पोलिसांनी त्यांच्याकडून ७१ मोबाईल, टीव्ही, रेकॉर्डिंग मशिन असा सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. खयवाडी करणारे छत्तीसगडमधील बुकी निशांत किशोर नागवाणी (वय २५, रा. कृष्णा कॉलनी, भाटापारा), अजय दयालदास चावला (वय २२, रा. सुदर, रायपूर), दीपक परसराम आहुजा (वय २२, रा. भईपारा, लाखेनगर, रायपूर), सतवीर सतनामदास बजाज (वय २८, रा. बजाजभवन, रायपूर), विशाल लक्ष्मणदास आहुजा (वय २७, रा. लाकानगर, भुईपारा, रायपूर), हितेश नानकराम चावला (वय २४, रा. लक्कावाडा, भगत चौक धमतरी), इंद्रकुमार भावनदास छुवानी (वय ४५, रा. सुदर गजबा, सिंधी मोहल्ला, धमतरी) आणि चंदन हेमंतदास बाखरेजा (वय २९, रा. रामनगर, रायपूर) यांना पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत ही कारवाई सुरू होती. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या मार्गदर्शनाखाली, उपायुक्त राकेश कलासागर, सहायक आयुक्त सोमनाथ वाघचौरे, ठाणेदार आर. डी. निकम, सहायक निरीक्षक प्रशांत जुमडे, उपनिरीक्षक गोडबोले, मदनकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.(प्रतिनिधी) पोलिसांना दीड लाख, घरमालकाला २५ हजार नागपूर हे क्रिकेट सट्ट्याचे मध्यभारतातील महत्त्वाचे सेंटर आहे. येथील बुकींचे देशविदेशात कनेक्शन असून, तेच परप्रांतीय बुकींना बोलवून नागपुरातून क्रिकेट सट्ट्याचा बाजार मांडतात. ठराविक बुकींची शहर पोलीस दलातील काही पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांशी साटेलोटे आहे. महिन्याला ते लाखोंची देण देऊन पोलिसांना कारवाईपासून दूर ठेवतात. त्यांच्याच माध्यमातून २५ हजार रुपये प्रतिमहिना भाड्याची सदनिका घेऊन हा अड्डा सुरू करण्यात आला होता. बुकींकडून पोलिसांना दीड लाख रुपये महिन्याची देण जात होती, अशीही सूत्रांची माहिती आहे. नागपुरातील खामला, वर्धमाननगर, गांधीबाग आणि जरीपटका कनेक्शनही यानिमित्ताने सट्टाबाजारात चर्चेला आले आहे. सीमसाठीही बनवाबनवी पोलिसांनी पकडलेल्या बुकींचा म्होरक्या अमित विरा असून, तो दुर्ग (भिलाई, छत्तीसगड) येथे बसतो. त्याच्याकडेच आम्ही या सट्ट्याची खयवाडी करीत होतो, अशी कबुली प्राथमिक तपासात बुकींनी दिल्याचे समजते. विशेष म्हणजे, या बुकींकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल व्यतिरिक्त २० सीमकार्ड आढळले. ते सर्वच्या सर्व दुसऱ्याच्या कागदपत्राच्या आधारे (बनावट नावाने) घेण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांनी या बुकींविरुद्ध फसवणुकीच्या कलम ४२० अन्वयेसुद्धा गुन्हा दाखल केला आहे.