शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
4
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
5
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
6
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
7
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
8
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
9
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
10
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
11
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
12
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
13
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
14
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
15
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
16
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
17
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
18
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
19
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
20
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त

तीन पिढ्यांचे मुक्त कलावैभव घडविणारे बसोली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:01 IST

लाल कावळा पिवळा राघू, बंधन नाही कशाचे, काढू फांद्या जमिनीलागून, आकाशीला मुळे, आम्ही बसोलीची मुले... बसोलीच्या जगाची ओळख म्हणजे या त्यांच्याच गीताप्रमाणेच आहे.

ठळक मुद्देरंगरेषांना बंधनमुक्त ठेवणारा ४३ वर्षांचा प्रवासचन्ने सरांनी साकारलेले कलाजग

लोकमत  न्यूज नेटवर्क नागपूर : लाल कावळा पिवळा राघू, बंधन नाही कशाचे,काढू फांद्या जमिनीलागून, आकाशीला मुळे, आम्ही बसोलीची मुले...बसोलीच्या जगाची ओळख म्हणजे या त्यांच्याच गीताप्रमाणेच आहे. मुक्त आणि दिलखुलास! रंग-रेखा, आकृती-बंध यांची चाकोरी नाही. मनास वाटतील तसे रंग चितारण्याची मुभा या बसोली नावाच्या शाळेत आहे. लहान मुलांना त्यांच्या भावविश्वानुरूप व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आहे. असे रंगरेषांना बंधनमुक्त ठेवणारे जग चित्रकार चंद्रकांत चन्ने यांनी वसवले. त्याच चिकाटीने त्यांच्या बालसदस्यांमध्ये कलासक्ती रुजवली आणि फुलवली. आज हे मुक्तविहारी कलाजग ४४ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. स्वतंत्र वृत्तीतून तीन पिढ्यांमध्ये कलेची आसक्ती फुलविण्याचे योगदान ‘बसोली’ने दिले आहे.शांतिनिकेतन, बडोदा येथून स्नातकोत्तर पदवी घेतल्यानंतर त्यांना चित्रकलेत पीएचडी करायची होती. ‘मुलांची भाषा’ हा त्यांचा पीएचडीचा विषय होता. त्यांचे गुरू निहार रंजन रे यांनी मातृभाषेतच मुलांमध्ये काम कर, अशी आज्ञा दिली. त्यावेळी नागपूरला येऊन चंद्रकांत चन्ने यांनी १५ मे १९७५ साली बसोलीची मुहूर्तमेढ रोवली. हिमालयाच्या पायथ्याशी असलेले व भारतीय कलासंस्कृती जपणारे गाव म्हणजे बसोली. या नावावरून वसवलेले चन्नेसरांचे हे कलाजग. पुढे पं. बच्छराज व्यास विद्यालयात शिक्षकाची नोकरी स्वीकारल्यापासून लहान मुलांमध्ये कलासक्ती रुजविण्याचा हा प्रवास त्यांच्या निवृत्तीनंतरही आजतागायत अविरत सुरू आहे.बसोलीचा सदस्य होण्यासाठी तीन ते चौदा वयोगटातील असण्यापलीकडे कसलीही अट नाही, प्रवेश फी नाही. चित्रकलेचे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे नाही. ‘ज्याला चालता येते तो आम्हाला चालतो’ हे बसोलीचे ब्रीदवाक्य. १९९४ पासून बसोलीची मुक्तशिबिरे सुरू झाली. वेळापत्रक झुगारून मनमोकळ्या वातावरणात मुलांना त्यांच्या अंगातील कलागुणांनी व्यक्त होऊ द्यायचे. येथे चित्रकला शिकवली जात नाही. जे हवे जसे हवे तसे चित्र रेखाटण्याची मुभा. मुलांना जपा, त्यांना वेळ द्या आणि त्यांच्यावर आपली मते लादू नका, अशीही शिबिरे घेण्याची चन्ने सरांची कळकळ. मुलांची अभिव्यक्ती बघून प्रत्येक पालकही मनोमनी सुखावतो. त्यांनी बसोलीची सुरुवात केली तेव्हा ४३ विद्यार्थी होते. आज या कलाजगाची सदस्यसंख्या दीड लाखांच्याहीवर गेल्याचे चंद्रकांत चन्ने यांनी सांगितले. चित्रकलेसोबत जोडून मुलांमध्ये नृत्य, लेखन, गायन, वक्तृत्व, शिल्पकला अशा इतरही कलागुणांना फुलविण्याचे काम बसोलीत सुरू झाले.

 असंख्य कलावंत निर्माण केलेकलेच्या या प्रवासात अनेक कलावंत घडविले असून विविध क्षेत्रत नावरूपास आले आहेत. ‘थ्री इडियट्स’चे प्रॉडक्शन डिझायनर रजनीश हेडाऊ, दिग्दर्शक राजेश मापुसकर, गायक राजेश ढाबरे, चित्रपट दिग्दर्शक अभिजित गुरू, नेपथ्यकार संजय काशीकर, अभिनेता मुकुंद वसुले, ग्राफिक डिझायनर विवेक रानडे असे अनेक व्यक्तिमत्त्व त्यांच्या क्षेत्रत योगदान देत आहेत.

 राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि शाबासकीकलानिर्मितीच्या या ४३ वर्षात दीड लाख सदस्य बसोलीशी जुडले. विविध आंतरराष्ट्रीय बालचित्रकला स्पर्धाअंतर्गत  ३४ देशांमध्ये मुलांनी सुवर्ण पदक प्राप्त केले.५ बालश्री पुरस्कार, शासनाच्या मानव कल्याण मंत्रलयातर्फे १०२ शिष्यवृत्ती अवॉर्ड व यासोबत अनेक राष्ट्रीय व राज्यस्तराचे पुरस्कार बसोलीच्या मुलांनी प्राप्त केले आहेत. ए.पी.जे.अब्दुल कलाम राष्ट्रपती असताना त्यांच्या कवितांवर काव्यचित्रे त्यांना पेश केली होती. विस्मयचकित महामहिमांनी ती चित्रे मागवून घेतली व राष्ट्रपती भवनात सुंदर चौकटीत आभूषित केली. गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर ह्यांच्या सव्वाशेव्या जयंतीनिमित्त त्यांच्या गीतांजलीवर बसोली बालकांनी रंगचित्रे रेखाटली. बाबा आमटेंच्या ‘ज्वाला आणि फुले’, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ‘मेरी कविताये’ तसेच कवी सुरेश भट व ग्रेस यांच्या कवितांवरही बसोलीच्या मुलांनी चित्र रेखाटून शाबासकी मिळविली. लंडनमध्ये सहा कार्यशाळा आणि कतारमध्ये आठ दिवसांचे शिबिरेही मुलांनी केली आहेत.

 आनंदी पालक, आनंदी मुलेयावर्षी मानवविकास मंत्रलयाअंतर्गत ‘आनंदी पालक, आनंदी मुले’ या संकल्पनेवर बसोलीतर्फे देशभरात उपक्रम राबविणार असल्याचे चंद्रकांत चन्ने यांनी सांगितले. नागपूरच्या शिबिरातही हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :artकलाnagpurनागपूर