लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अॅग्रो व्हिजनमध्ये विविध विषयांवर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली. त्यामुळे अॅग्रो व्हिजनमधील ज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांनी समृद्ध व्हावे, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.दहाव्या अॅग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाच्या समारोपीय समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर खासदास रामदास तडस, माजी खासदार दत्ता मेघे, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष आशिष जैस्वाल, अॅग्रो व्हिजन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, रवी बोरटकर, आयोजन समितीचे सचिव रमेश मानकर आदी उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणाले, शेतकऱ्यांनी शेतीला उद्योगाची जोड दिल्यास त्यांना चांगला भाव मिळेल. शेतकऱ्यांनी फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये कसे काम करता येईल, याचा विचार करावा. तणस, तुऱ्हाटी, बांबूपासून बायो सीएनजी तयार केल्यास त्यांना १ लाखाऐवजी ४० हजाराचे डिझेल लागेल. नागपुरात २५ कोटी रुपये खर्चुन शेतकºयांना प्रशिक्षण देणारे अॅग्रोव्हिजन ट्रेनिंग सेंटर उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, कृत्रिम गर्भ तयार करून गाईची जात सुधारण्याचा प्रयत्न होत आहे. यापुढे गार्इंना गोऱ्हेच होतील. प्रदर्शनातील पशु प्रदर्शनही लोकप्रिय झाल्याचे सांगून त्यांनी एकाही शेतकऱ्याला आत्महत्येची वेळ येऊ नये असा समृद्ध विदर्भ उभा राहण्यास या प्रदर्शनामुळे मदत झाल्याचे सांगितले. संचालन रेणुका देशकर यांनी केले. आभार रमेश मानकर यांनी मानले.उत्कृष्ट शेतकऱ्यांचा झाला गौरव
अॅग्रो व्हिजनमधील ज्ञानाच्या आधारे शेतकऱ्यांनी समृद्ध व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:26 IST
अॅग्रो व्हिजनमध्ये विविध विषयांवर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली. त्यामुळे अॅग्रो व्हिजनमधील ज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांनी समृद्ध व्हावे, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
अॅग्रो व्हिजनमधील ज्ञानाच्या आधारे शेतकऱ्यांनी समृद्ध व्हावे
ठळक मुद्देनितीन गडकरींचे आवाहन : दहाव्या अॅग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाचा समारोप