शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वर्दीत लाचखोरांची गर्दी!

By admin | Updated: February 28, 2017 01:46 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागपूर कार्यालयातर्फे २०१६ या एका वर्षात एकूण १३५ लाच प्रकरणे नोंदविण्यात आली.

नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागपूर कार्यालयातर्फे २०१६ या एका वर्षात एकूण १३५ लाच प्रकरणे नोंदविण्यात आली. मागील वर्षीच्या तुलनेत सापळा प्रकरणांमध्ये २१ टक्क्यांनी घट झाली आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीप्रमाणे २०१६ मध्येदेखील लाच प्रकरणांत सर्वात जास्त पोलीस खात्यातील अधिकारी-कर्मचारी अडकले होते. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी २०१६ या वर्षभरातील लाच प्रकरणे, त्यात अडकलेले अधिकारी-कर्मचारी, झालेली कारवाई इत्यादीसंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे माहितीच्या अधिकारात विचारणा केली होती. यातून मिळालेल्या आकडेवारीनुसार २०१६ मध्ये वर्षात १३५ सापळा प्रकरणांमध्ये १७६ आरोपी अडकले. एकूण सापळ्यांत अडकलेल्यांमध्ये पोलीस विभागातील ४९ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. २०१५ मध्ये महसूल खात्याचादेखील लाचखोरांमध्ये पहिला क्रमांक होता. यंदा ही संख्या घटली असून २०१६ मध्ये ३० जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ््यात अडकले. शिक्षण विभागातील १३ जणांवर कारवाई झाली. त्यानंतर कृषी व वनविभागातील प्रत्येकी १० तर ग्रामपंचायतेतील ९ जणांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)‘क्लास वन’चे ११ अधिकारी सापळ्यात१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत एकूण १३१ ‘क्लास वन’ अधिकाऱ्यांवर लाच घेतल्याप्रकरणी कारवाई झाली. यात शिक्षण विभागातील ५ तर कृषी, पोलीस, महसूल विभागातील प्रत्येकी २ अधिकारी आहेत. दुसऱ्या श्रेणीतील १७ अधिकाऱ्यांना लाच प्रकरणात पकडण्यात आले. सर्वात कमी म्हणजे ७ कर्मचारी हे चतुर्थ श्रेणीतील निघाले.पाच वर्षांत ५८६ प्रकरणे२०१२ पासून नागपुरात लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातर्फे लाचखोरीची ५८६ प्रकरणे समोर आणण्यात आली. २०१२ ते २०१५ मध्ये हे प्रकरणांचे प्रमाण सातत्याने वाढत होते. मात्र २०१६ मध्ये एकूण सापळ्यांचे प्रमाण घटलेले आहे.