शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बाराखोलीत जुगार अड्डा

By admin | Updated: September 29, 2015 04:21 IST

बाराखोली (इंदोरा) परिसरात खुलेआम जुगार अड्डा सुरू असून, रोज लाखोंची हारजित होत आहे. हारजितच्या

नागपूर : बाराखोली (इंदोरा) परिसरात खुलेआम जुगार अड्डा सुरू असून, रोज लाखोंची हारजित होत आहे. हारजितच्या कारणावरून दोन दिवसांपूर्वी होणाऱ्या वादामुळे येथे मोठी घटना होण्याची भीती वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे, पोलिसांना या जुगार अड्ड्याची माहिती असूनही कारवाई केली जात नसल्यामुळे या जुगार अड्ड्याला पोलिसांचा आशीर्वाद असल्याचा आरोप होत आहे. बाराखोली भागात गेल्या अनेक दिवसांपासून हा जुगार अड्डा सुरू आहे. प्रारंभी तो लपूनछपून चालवला जात होता. अलीकडे जरीपटका ठाण्यातील काही पोलिसांसोबतच गुन्हे शाखेतील काही पोलिसांचीही सेटिंग झाल्यामुळे हा अड्डा खुलेआम सुरू असल्याचे सांगितले जाते. रोज रात्री येथे शहरातील अनेक भागातून जुगारी येतात. पोलिसांकडून कारवाईचा धोका नसल्याचे जुगार भरविणारे सांगत असल्यामुळे येथे अनेक अट्टल जुगारी रात्रभर जुगार खेळतात. धर्मा, मनोज आणि राजू जुगार अड्डा संचालित करतात, अशी माहिती आहे. अड्ड्यावर लाखोंची हारजित होते. हारणारे दारूच्या नशेत आपला संताप व्यक्त करीत असल्यामुळे येथे वेळोवेळी जुगाऱ्यांमध्ये भांडणेही होतात. तीन दिवसांपूर्वी दोन जुगाऱ्यात मोठा वाद झाला. एकमेकांना पाहून घेण्याची धमकीही देण्यात आली. यावेळी अड्डा भरविणाऱ्याने कशीबशी दोघांची समजूत काढून वाद मिटविल्याचे समजते. मात्र, अशाच प्रकारच्या वादामुळे येथे एखादी मोठी घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जुगार अड्ड्यााचा या भागातील नागरिकांना मोठा त्रास असून, पोलिसांना फोनवरून माहिती देऊनही कारवाई केली जात नसल्याची ओरड आहे. जरीपटका ठाण्यातील काही जण येथे नेहमीच ‘चक्कर’ मारत असल्याचेही सांगितले जाते. पोलीस आयुक्तांनी या अड्ड्यावर अचानक कारवाई करावी, अशी मागणी आहे. अचानक कारवाई झाल्यास येथे लाखोंची रोकड आणि अनेक जुगारी पोलिसांच्या हाती लागू शकतात, अशीही या भागातील नागरिकांमध्ये कुजबूज आहे.(प्रतिनिधी)